शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जुगाराच्या अड्ड्यांवर रंगताहेत डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:06 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात असून, साथरोग कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असताना दुसरीकडे मात्र शहरात चोरीछुप्या पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या जुगार अड्ड्यांवर गर्दी दिसून येत आहे. जुगारी मोठ्या संख्येने एकत्र येत पत्त्यांचा डाव रंगवत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देगर्दी होतेय कशी : ‘कोरोना’ची कुठलीही भीती नाही

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात असून, साथरोग कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असताना दुसरीकडे मात्र शहरात चोरीछुप्या पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या जुगार अड्ड्यांवर गर्दी दिसून येत आहे. जुगारी मोठ्या संख्येने एकत्र येत पत्त्यांचा डाव रंगवत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून धार्मिक सण, उत्सव, यात्रादेखील स्थगित करण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालये, मंदिरे, उद्याने, आठवडे बाजार, मॉल्सदेखील बंद करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर ३१ मार्चपूर्वी होणारे विवाह समारंभ, सोहळेदेखील रद्द करण्याचे आदेश दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.नागरिकांची गर्दी शक्य तितक्या प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न सर्वत्र होत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनाही गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान, शहरातील जुगार अड्डे मात्र रंगात आले आहेत.सर्वत्र बंद असल्यामुळे जुगाºयांनी एकत्र येत पत्ते कुटण्याचा सपाटा लावला आहे. प्रत्येक जुगार अड्ड्यावर किमान पंधरा ते पंचवीस जुगारी एकत्र येऊन सर्रासपणे जुगार रंगवित असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.या जुगाºयांना कोरोनाची कुठलीही भीती नसल्याचे चित्र असून, पोलीस यंत्रणेचेही जुगार अड्ड्यांकडे दुर्लक्ष झाल्याने जुगार अड्ड्यांना कोरोना कालावधीत सुगीचे दिवस आल्याचे बोलले जात आहे. गर्दीच्या सर्व ठिकाणांवर शासकीय यंत्रणा लक्ष ठेवून असताना जुगार अड्ड्यांकडेही लक्ष देणे गरजेचे असून थेट धडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.धडक कारवाईची मोहीम राबविण्याची मागणीजुगार अड्डे चालविणे कायद्याने गुन्हा असला तरी चोरट्या मार्गाने नजरेस येणार नाही, अशा ‘भूमिगत’ जागांची निवड करत तेथे जुगार खेळला व खेळविला जात आहे. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असे जुगाराचे डाव राजरोसपणे रंगत असल्याचे नागरिकांनी सांगितले. संबंधित पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकांनाही जुगाºयांचे ठावठिकाणे ज्ञात असूनही त्यांच्याकडून अज्ञात असल्याचे भासविले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी जुगार अड्ड्यांवर धडक कारवाईची मोहीम हाती घेण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य