शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा शल्य चिकित्सक जगदाळे सक्तीच्या रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 01:25 IST

नाशिक: कोरोनाचा जिल्'ात प्रादुर्भाव वाढत असताना सातत्याने प्रकृतीचे कारण देत गैहजर व कोरोनाचा अटकाव करण्यासाठी अपयशी ठरल्याने जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे यांना शासनाने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. त्यांचा पदभार रत्ना रावखंडे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देहलगर्जीपणा नडला: रावखंडे यांच्याकडे पदभार

नाशिक: कोरोनाचा जिल्'ात प्रादुर्भाव वाढत असताना सातत्याने प्रकृतीचे कारण देत गैहजर व कोरोनाचा अटकाव करण्यासाठी अपयशी ठरल्याने जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे यांना शासनाने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. त्यांचा पदभार रत्ना रावखंडे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जगदाळे हे गेल्या वर्षी मे महिन्यात सेवानिवृत्त झाले होते, मात्र शासन दरबारी त्यांनी स्वत:ची मुदतवाढ करून घेत जिल्हा रुग्णालयात नेमणूक करून घेतली. त्यांच्या काळात जिल्हा रुग्णालयाला स्वचतेचे राज्यातील पाहिले बक्षीस मिळाले असले तरी, याच काळात त्यांचे प्रश्नावरील नियंत्रण सुटले होते. विशेष करून कोरोनाच्या संक्रमण काळात जिल्'ातील ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले. ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटर, कोविड रुग्णालयात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांनी हात आखडता घेतला. एवढेच नव्हे तर शासन दरबारी माहिती पाठविणे, बैठका घेण्यात त्यांनी दुर्लक्ष केले. या संदर्भात त्यांच्या कामाबद्दल संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी नाराजीही बोलून दाखवली होती. महत्त्वाचे निर्णय घेताना वेळकाढूपणा, आरोग्य उपकरणे खरेदी बाबतही त्यांच्यावर संशय घेण्यात आले होते. अलीकडेच ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यात त्यांनी चालविलेले चालढकल पाहता त्यांना तीन ते चार वेळा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. अशा नोटीस आल्यावर मात्र त्यांनी आरोग्याचे कारण दाखवीत रजेवर जाणे पसंत केले तसेच हाता खालच्या अधिकाºयावर जबाबदारी सोडून दिली होती. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापन कोलमडून पडले होते. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली असता अनेक गंभीर बाबी समोर आल्या होत्या. विशेष म्हणजे त्या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक गैरहजर होते. या सर्व गोष्टी शासनाच्या निदर्शनास आल्यावर बुधवारी राज्याचे आरोग्य विभागाच्या अवर सचिवांनी जगदाळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यांचा पदभार पूर्वी आरोग्य उपसंचालक रत्ना रावखंडे यांच्याकडे सोपविण्यात यावेत असे आदेश दिले. रत्ना रावखंडे यांनी आपली पदोन्नती टाळत शल्य चिकित्सक म्हणून राहण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून, सध्या त्या पदस्थापने विना आहेत.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य