शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जि. प. कर्मचाऱ्यांचेही अपंग प्रमाणपत्र बोगस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:37 IST

नाशिक : जिल्हा परिषदेतील काही कर्मचाºयांनी बदल्यांच्या लाभासाठी अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत जिल्हा परिषदेतील दोन कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देदोघांना नोटिसा : बनावट प्रमाणपत्र

नाशिक : जिल्हा परिषदेतील काही कर्मचाºयांनी बदल्यांच्या लाभासाठी अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत जिल्हा परिषदेतील दोन कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्याचे वृत्त आहे.जिल्हा परिषदेकडील शिक्षकांकडून अपंगांचे बोगस प्रमाणपत्र सादर करून बदलीचे लाभ मिळविले जात असल्याच्या तक्रारी प्रहार संघटनेकडून करण्यात आल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी शिक्षण विभागातील बोगस प्रमाणपत्र सादर करणाºया शिक्षकांवर कारवाई केली होती.या प्रकरणी केवळ शिक्षकांनीच नव्हे तर जिल्हा परिषदेतील काही कर्मचाºयांनीदेखील बदली टाळण्यासाठी अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर अशा कर्मचाºयांच्या प्रमाणपत्र तपासणीचा निर्णय घेण्यात आला होता.प्रशासनाने केलेल्या तपासणीत जिल्हा परिषदेतील दोन कर्मचाºयांनी सादर केलेले प्रमाणपत्र हे बोगस आढळून आल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने या दोन्ही कर्मचाºयांना नोटिसा बजावल्याचे समजते. संबंधितांना शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी खातेनिहाय चौकशी आणि कारवाई करण्यासंदर्भात इशारा देण्यात आला असल्याचेही बोलले जात आहे. दोेघे आढळले दोषीअपंग प्रमाणपत्र दाखल केलेल्या शिक्षकांचे प्रमाणपत्र पडताळणी करण्याचे आदेश तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी काढल्यानंतर मुख्यालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचाºयांनी देखील अशाच प्रकारे प्रमाणपत्रे सादर केल्याच्या थेट तक्रारी झाल्यानंतर अशा कर्मचाºयांची चौकशी करण्यात आली. यामध्ये केवळ दोन कर्मचारी दोषी आढळून आले आहेत. या कर्मचाºयांवर आता काय कारवाई होते, याकडे कर्मचाºयांचे लक्ष लागले आहे.