शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
4
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
5
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
6
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
7
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
8
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
9
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
10
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
11
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
12
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
13
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
14
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
15
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
16
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
17
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
18
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

जिल्ह्यात आता 'सारी' रुग्णाचीही भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 22:12 IST

कोरोना रुग्णासारखीच लक्षणे असणाऱ्या सारी आजारात प्रामुख्याने श्वास घेण्यास त्रास होणे, खूप ताप, सर्दी, खोकला लागणे, फुफुसात सूज येणे, अल्पावधीत रुग्ण गंभीर होणे असे लक्षणे आहेत,

ठळक मुद्देकोविड प्रमाणेच उपचार करण्यावर भर दिला जात आहे

नाशिक :  जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असताना त्यात आता 'सारी' रुग्णाचीही भर पडली असून, या आजाराने औरंगाबाद येथे घेतलेले बळी पाहता, सारी चे रुग्ण सापडताच त्याची कोविड टेस्ट करून तात्काळ उपचार केले जात आहेत.कोरोना रुग्णासारखीच लक्षणे असणाऱ्या सारी आजारात प्रामुख्याने श्वास घेण्यास त्रास होणे, खूप ताप, सर्दी, खोकला लागणे, फुफुसात सूज येणे, अल्पावधीत रुग्ण गंभीर होणे असे लक्षणे आहेत, त्यामुळे सध्या कोरोना सारखीच लक्षणे दिसणाऱ्या परंतु कोरोना नसणाऱ्या रुग्णाला कोविड प्रमाणेच उपचार करण्यावर भर दिला जात आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते सारी हा आजार या पूर्वी देखील होता, फक्त त्याचे निदान होत न्हवते, आता कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केल्यावर प्रामुख्याने सारी आजाराचे गंभीर्य लक्षात येऊ लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रत्येक गावात आरोग्य विभागाने कोरोना केअर सेंटर सुरू करून नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात असल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सारी आजाराचे रुग्ण आढळू लागले आहेत, या आजाराच्या रुग्णांची स्वतंत्र नोंद ठेण्यात येत असून काल पर्यंत 17 रुग्ण सारी आजाराने बाधित असल्याचे सांगण्यात आले, त्यात चांदवड ला 3 व कळवणला 14 रुग्ण आढळून आले, त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मात्र सारी आजाराने जिल्ह्यात डोके वर काढू नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे. सारी आजाराचे विषाणू अनेक प्रकारचे असल्याने त्याला अगोदर प्रतिबंध करणे अवघड असले तरी या रुग्णांना वेळेवर जलदगतीने उपचार मिळणे हेच महत्त्वाचे मानले जाते.साध्य अशा प्रकारचे रुग्ण सापडल्यास त्याचेही घश्याचे नमुने घेवून ते कोरोना प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. कोरोना पोसिटिव्ह असल्यास कोरोना प्रतिबांध उपाय केले जात आहेत तर निगेटिव्ह असल्यास सारी वर उपचार केले जात आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते, डेंग्यू, स्वाइन फ्ल्यूच्या साथीच्या काळातही सारी आजार कायम होता, मात्र या साऱ्या आजारावर टॉमी फ्ल्यू चे औषधे गुणकारी ठरले होते, आताही कोरोना बाधित किंवा सारी आजाराने पीडित रुग्णाला2 टॉमी फ्ल्यू दिले जात आहे. औरंगाबाद येथे सारी ने अनेक बळी घेतले आहेत, नाशिक जिल्ह्यात मात्र सारी चे रुग्ण झपाट्याने बरे होत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस