शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला ७३ हजार क्विंटल बियाणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 01:27 IST

यंदा मान्सून वेळेत आणि समाधानकारक पडणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला ७३ हजार ६५४ क्विंटल बियाण्याची गरज असून तशी मागणी जिल्हा कृषी विभागाने नोंदविली आहे. 

ठळक मुद्देनियोजन : खासगी क्षेत्रावर अधिक भर

नाशिक : यंदा मान्सून वेळेत आणि समाधानकारक पडणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला ७३ हजार ६५४ क्विंटल बियाण्याची गरज असून तशी मागणी जिल्हा कृषी विभागाने नोंदविली आहे. यंदाही बियाणे पुरवठ्याबाबत खासगी क्षेत्रावर अधिक भर देण्यात आला आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात बाजरी, ज्वारी, भात, मका, नागली, कापूस, सोयाबिन आदी पिके प्रामुख्याने घेतली जातात. मागील तीन वर्षांत सरासरी ६ लाख २३ हजार ७९ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली आहे. तर तीन वर्षांत सरासरी ६३ हजार २३८ क्विंटल बियाण्याचा जिल्ह्याला पुरवठा झाला होता. सन २०२१ च्या खरीप हंगामात सोयाबिन वगळता ५ लाख ६५ हजार २७० हेक्टर क्षेत्र खरीप पिकांसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. जिल्ह्याला ४८ हजार ९२४ क्विंटल मका तर १८  हजार ३६२ क्विंटल भाताच्या बियाण्याची गरज असून तशी मागणी कृषी विभागाने नोंदविली आहे. महाबीजकडून जिल्ह्याला ७८०१ तर राष्ट्रीय बीजनिर्मितीकडून ३०८५ क्विंटल बियाण्याचा पुरवठा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गतवर्षीच्या  खरिपात ९७,१०२ क्विंटल बियाण्याची विक्री झाली होती. बांधावर होणार खत, बियाणे पुरवठा खरीप हंगामात शेतकऱ्यांना बांधावर खत आणि बियाणे पुरविण्याची योजना याही वर्षी राबविण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगितले जात आहे. गतवर्षी या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. २०२० च्या खरीप हंगामात १ लाख ४२ हजार ८९४ शेतकऱ्यांना ३१,०१७ क्विंटल बियाणे व ४५,९२८ मे. टन खत बांधावर पुरविण्यात आले होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती