शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येने शंभरी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 01:53 IST

कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकºयांनी शंभरी ओलांडली असून, नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे एका महिला शेतकºयानेही आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती दौºयावर असताना बागलाण तालुक्यात शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

नाशिक : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकºयांनी शंभरी ओलांडली असून, नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे एका महिला शेतकºयानेही आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती दौºयावर असताना बागलाण तालुक्यात शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.सरकारने गेल्या वर्षी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकºयांचे सरसकट दीड लाखापर्यंतचे कर्जमाफ केलेले असतानाही डिसेंबरअखेर १०५ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. यंदाही त्याच दिशेने वाटचाल सुरू असून, जानेवारी महिन्यापासून आजपावेतो दरमहा साधारणत: नऊ ते दहा शेतकरी आत्महत्या करीत आहेत. नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे मंगलाबाई बाबासाहेब पवार (३९) या शेतकरी महिलेने नोव्हेंबर महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.या महिलेच्या नावावर शेती असली तरी, तिने कौटुंबिक कारणावरून आत्महत्या केली असावी, असा अंदाज बांधून पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला. परंतु चौकशीअंति तिच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारण नसल्याचे स्पष्ट झाल्याचा अहवाल शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला, तर नाशिक तालुक्यातील दोनवाडे येथील सांगळे नामक शेतकºयाने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळाली आहे. गुरुवारी दुपारी बागलाण तालुक्यातील भडाणे येथील तात्याभाऊ साहेबराव खैरनार (४४) या शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली असून, त्याच्या नावे २.१० हेक्टर शेतजमीन असून, त्याच्या आत्महत्येमागचे कारणाचा शोध घेतला जात आहे. या तिघा शेतकºयांच्या आत्महत्येने जिल्ह्णाची संख्या १०१ वर पोहोचली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्या