शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यासाठी साडेपाच हजार इव्हीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 01:11 IST

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष एकीकडे युती, आघाडीची चर्चा करीत असताना दुसरीकडे निवडणूक यंत्रणेने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. जिल्ह्याला ५,४७९ नवीन मतदान यंत्रे मिळणार आहेत. मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्याबरोबरच यंदा पहिल्यांदाच या निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात येणार असल्याने नाशिक जिल्ह्णासाठी ५,४७९ नवीन मतदान यंत्रे देण्यात आली

ठळक मुद्देलोकसभेची तयारी : पहिल्यांदाच होणार ‘व्हीव्हीपॅट’चा वापर

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष एकीकडे युती, आघाडीची चर्चा करीत असताना दुसरीकडे निवडणूक यंत्रणेने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. जिल्ह्याला ५,४७९ नवीन मतदान यंत्रे मिळणार आहेत.मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्याबरोबरच यंदा पहिल्यांदाच या निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात येणार असल्याने नाशिक जिल्ह्णासाठी ५,४७९ नवीन मतदान यंत्रे देण्यात आलीआहे. जिल्ह्याचे पथक यंत्रे घेण्यासाठी बेंगलोर येथे रवाना झाले आहे. देशपातळीवर लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची चर्चा होत असताना त्यास निवडणूक आयोगाने प्रतिकूलता दर्शविली असली तरी, सध्याचे तापलेले राजकीय वातावरण पाहता, लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक राजस्थान, मध्य प्रदेश आदी राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या बरोबरीने घेण्याची शक्यताही वर्तविली जात आहे तसे झाल्यास डिसेंबरअखेर या निवडणुका होतात की काय असे वाटू लागल्याने निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेगाने सुरुवात केली आहे. त्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्यात येत आहे. यादीत कृष्णधवल छायाचित्र असलेल्या मतदारांचे रंगीत छायाचित्र गोळा करण्यात आले आहे. शिवाय प्रत्येक मतदाराच्या घरोघरी जाऊन त्यांची संपूर्ण अद्ययावत माहिती भ्रमणध्वनी क्रमांकासहीत गोळा करण्यात आली आहे. नवीन मतदान केंद्रे तयार करण्यात येऊन अशा केंद्रांवर मतदारांसाठी सोयी, सुविधा पुरविण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.निवडणूक आयोगाकडून वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम यंत्रावर गेल्या काही निवडणुकांपासून राजकीय पक्षांकडून व विशेषत: विरोधी पक्षांकडून संशय व्यक्त केला जात असल्यामुळे आयोगाने आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्याते ठरविल्याने जुने ईव्हीएम यंत्रे आयोगाने आपल्या ताब्यात घेतले आहेत. नाशिक जिल्ह्णातील नाशिक, दिंडोरी व धुळे या तीन लोकसभा मतदारसंघातील एकूण ४२२८ मतदान केंद्रांचा विचार करता निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांच्या संभाव्य संख्येचा विचार करता दुपटीने म्हणजेच ९,४२२ बॅलेट युनिट देण्याचे ठरविले असून, त्यासाठी ५,४७९ कंट्रोल युनिट मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्णातील अधिकाºयांचे पथक यंत्रे घेण्यासाठी बेंगलोरला रवाना झाले असून, आठ कंटेनरद्वारे प्रचंड पोलीस बंदोबस्तात येत्या एक, दोन दिवसांत यंत्रे दाखल होतील.वाढीव यंत्रे नंतर मिळणारनाशिक जिल्ह्णात मतदान केंद्र पुनर्रचनेत २२० केंद्रे नवीन वाढीव तयार करण्यात आली असून, त्याला अद्याप निवडणूक आयोगाने मंजुरी दिलेली नसल्याने ४२२८ या जुन्याच मतदान केंद्रांच्या तुलनेत वाढीव २० टक्क्याच्या प्रमाणात सध्या नवीन ‘ईव्हीएम’ यंत्रे देण्यात आली असून, नवीन मतदान केंद्रांना मंजुरी मिळाल्यानंतर पुन्हा जिल्ह्णासाठी वाढीव यंत्रे देण्यात येणार आहेत. तसेच आयोगाकडून अजूनही ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राची निर्मिती सुरू असल्याने जिल्ह्णाला पुढच्या टप्प्यात व्हीव्हीपॅट देण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. १ सप्टेंबर रोजी आयोगाकडून अद्ययावत विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. वाढलेल्या नव मतदारांच्या प्रमाणात मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्यात आली आहे.