शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा न्यायालयात असणार ५० टक्के कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 01:24 IST

जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायालयीन कामकाज मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन सत्रांत चालणार आहे. दोन्ही सत्रांमध्ये न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची हजेरी राहणार आहे; मात्र कर्मचारी संख्येत कपात करण्यात येणार आहे. अवघ्या ५० टक्के कर्मचाऱ्यांची हजेरी बंधनकारक करण्यात आली असून मंगळवारपासून (दि.३०) या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.

ठळक मुद्देकोरोना प्रतिबंधक नियम सक्तीचे : दोन्ही सत्रांत सर्व न्यायाधीशांची राहणार उपस्थिती

नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयातीलन्यायालयीन कामकाज मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन सत्रांत चालणार आहे. दोन्ही सत्रांमध्ये न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची हजेरी राहणार आहे; मात्र कर्मचारी संख्येत कपात करण्यात येणार आहे. अवघ्या ५० टक्के कर्मचाऱ्यांची हजेरी बंधनकारक करण्यात आली असून मंगळवारपासून (दि.३०) या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.राज्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यात योग्य खबरदारी घेत कामकाज सुरू ठेवण्यावर भर दिला जात आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स आणि स्वच्छता या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे. दरम्यान, न्यायालयांमध्येही गर्दी होत असल्याने तेथेही कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. यामुळे उच्च न्यायालयाने आता न्यायालयीन कामकाजात पुन्हा बदल केले आहेत. त्यानुसार न्यायालयीन कामकाजाची वेळ पहिल्या सत्रात सकाळी साडेअकरा वाजेपासून दीड वाजेपर्यंत तर दुसऱ्या सत्रात दुपारी दोन ते साडेचार वाजेपर्यंत अशी करण्यात आल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. दोन्ही सत्रांमध्ये सर्व न्यायाधीश हजर राहणार आहेत; मात्र न्यायालयीन कर्मचारी वर्गाची उपस्थिती ५० टक्के इतकी केली आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे कामकाज राहील त्याच वकील व पक्षकारांना न्यायालयात प्रवेश राहणार आहे. तसेच एखाद्या प्रकरणात पक्षकार किंवा वकील हजर न राहिल्यास त्यांच्याविरोधात न्यायालयाकडून ऑर्डर केली जाणार नसल्याचेही उच्च न्यायालयाने परिपत्रकात स्पष्ट केले आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार, वकिलांनाही बंधनकारक करण्यात आले आहे. पहिल्या सत्रात पुरावा घेण्याचे काम प्राधान्याने होणार असून दुसऱ्या सत्रात वकिलांचे युक्तिवाद, निकाल व इतर न्यायालयीन कामे पार पडणार आहेत. हे नियम जिल्हा व तालुका न्यायालयांनादेखील लागू राहणार आहेत. तसेच कामाशिवाय वकील व पक्षकारांनी न्यायालयात गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या