नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणाºया जिल्हा नियोजन बैठकीला अद्याप आठ दिवसांचा अवधी असून, जिल्हा प्रशासनाकडून नियोजन बैठकीची तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला.जिल्हा नियोजनाची बैठक येत्या १८ रोजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे होणार आहे. दरवर्षी जानेवारीत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक घेतली जाते. यंदा भुजबळ यांच्या उपस्थितीत सदर बैठक होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्णाच्या नियोजनासंदर्भातील तरतुदी आणि उपाययोजनांच्या बाबतीत अधिकाºयांनी केलेल्या नियोजना संदर्भातील माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जाणून घेतल्या. दि. १८ रोजी दुपारी दोन वाजता नियोजन भवनात सकाळी ११ वाजता जिल्ह्णाच्या नियोजना संदर्भात अधिकाºयांची बैठक आणि त्यानंतर दुपारी २ वाजता पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजनाची बैठक पार पडणार आहे. नियोजन बैठकीची तारीख निश्चित झाल्यानंतर प्राप्त निधी आणि खर्चित निधीबरोबरच विभागांकडून आलेला नियोजन प्रस्ताव याविषयीची तयारी सुरू करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हा नियोजनाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 01:24 IST