शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी : बागलाण, मालेगाव तालुक्यात उपाययोजना राबविण्याचे आदेश साठ गावे पाणीटंचाईग्रस्त घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:21 IST

भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या अहवालानुसार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बागलाण व मालेगाव तालुक्यातील तब्बल साठ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत.

सटाणा : भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या अहवालानुसार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बागलाण व मालेगाव तालुक्यातील तब्बल साठ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. या गावांना प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत संरक्षित करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.शासनाच्या टंचाई कृती आराखड्यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून अशा तीन टप्प्यात टंचाई निवारणासाठी उपाययोजनाकरण्यात येतात. जिल्हाधिकाºयांनी पाणीटंचाई निवारणासाठी भूवैज्ञानिक व भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.नुकत्याच झालेल्या टंचाई आढावा बैठकीत सादर केलेल्या सर्वेक्षण अहवालात, बागलाण व मालेगाव तालुक्यात आॅक्टोबर ते मार्च अखेरपर्यंत भूगर्भातील पाण्याची पातळी टिकून राहणार आहे. त्यामुळे हे सहा महिने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही. मात्र त्यानंतर पाण्याच्या पातळीत घट होऊन एप्रिल ते जून हे तीन महिने साठ गावांना पाण्याची टंचाई निर्माण होणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी साठे गावे टंचाईग्रस्त घोषित करून, संबंधित गावांना खबरदारीच्या सूचना करून पिण्याच्या पाण्याचे स्रोत संरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत. हे ३१ जुलै २०१८ पर्यंत लागू राहणार आहेत.या गावांमध्ये पाणीटंचाईघोषित केलेल्या गावांमध्ये बागलाण तालुक्यातील चिराई, महड, सारदे, वायगाव, रातीर, देवळाणे, सुराणे, राजपूरपांडे, श्रीपूरवडे, टिंगरी, उत्राणे, वडे खुर्द, वाघळे, ब्राह्मणपाडे, जायखेडा, जाखोड, करंजाड, लाडूद, निताणे, सोमपूर, आसखेडा, द्याने, फोपीर, खिरमाणी, कोटबेल, नामपूर, अजमीर सौंदाणे, कºहे, जुनी शेमळी, लखमापूर, यशवंतनगर, अंतापूर, दगडपाडा, जामोटी, मोराणे दिगर, मुल्हेर, रावेर, ताहाराबाद, वडे दिगर, अलियाबाद, बाभुळणे, बोरदैवत, कांद्याचा मळा, खरड, परशुरामनगर, वाघंबे तसेच मालेगाव तालुक्यातील कजवाडे, पोहाणे, विराणे, भायगाव, अजंग, कोठरे बुद्रूक, सातमाणे, वडनेर, पांढरून या गावांचा समावेश आहे.