शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचा ‘आंदोलन’ वार !

By श्याम बागुल | Updated: July 15, 2019 18:45 IST

जिल्हा बॅँकेत नाशिक जिल्ह्यातील नागरी, बिगर शेती पतसंस्थांचे सुमारे अडीचशे कोटी रुपये ठेवी व खात्यांमध्ये अडकून पडले असून, नोटबंदी झाल्यानंतर जिल्हा बॅँक आर्थिक अडचणीत आल्याने जिल्ह्यातील पतसंस्थांची रक्कम जिल्हा बॅँकेत अडकून पडली.

ठळक मुद्देफेडरेशनचे धरणे : स्वाभिमानीकडून प्रवेशद्वार बंदपाय-यांवरच ठिय्या मांडला व बॅँकेत जाणा-या येणा-यांची वाट अडवली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडे पतसंस्थांचे अडकून पडलेल्या ठेवी तत्काळ मिळावे यासाठी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने करण्यात आलेले धरणे आंदोलन व शेतकऱ्यांकडील सक्तीची कर्जवसुली थांबविण्यात यावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा बॅँकेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडल्याने सोमवार जिल्हा बॅँकेसाठी आंदोलनाचा वार ठरला. अखेर या संदर्भात तोडगा काढण्यासाठी सहकारमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्हा बॅँकेत नाशिक जिल्ह्यातील नागरी, बिगर शेती पतसंस्थांचे सुमारे अडीचशे कोटी रुपये ठेवी व खात्यांमध्ये अडकून पडले असून, नोटबंदी झाल्यानंतर जिल्हा बॅँक आर्थिक अडचणीत आल्याने जिल्ह्यातील पतसंस्थांची रक्कम जिल्हा बॅँकेत अडकून पडली. त्यामुळे पतसंस्थांना दैनंदिन कामकाज करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या. दैनंदिन रोखता रक्कम अडकल्यामुळे पतसंस्थांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व नाशिक विभागीय नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सकाळी ११ वाजता जिल्हा बॅँकेच्या जुना आग्रारोडवरील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बॅँकेच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येऊन फेडरेशनच्या पदाधिका-यांनी थेट विभागीय आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या कानी सदरचा प्रकार घातला. यावेळी विभागीय आयुक्तांनी जिल्हा बॅँकेचे पदाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांना बैठकीसाठी पाचारण करून यावर मार्ग काढण्यासाठी मंगळवारी फेडरेशनचे पदाधिकारी व बॅँकेच्या पदाधिका-यांनी सहकारमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले. त्याचबरोबर बॅँकेकडे पैसे जमा करण्यासाठी कोणते मार्ग आहेत, त्यावर चर्चा करण्यासाठी येत्या आठवड्यात पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनात वसंतराव लोढा, गोपाळ पाटील, अंजली पाटील, उत्तमराव पाटील, हेमंत देवधर, आत्माराम मुरकुटे, दिलीप लवटे, बापूसाहेब गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील पतसंस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.स्वाभिमानीने रस्ता अडवलापतसंस्था फेडरेशनचे आंदोलन आटोपत नाही तोच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जिल्हा बॅँकेवर धडक देत थेट बॅँकेच्या पाय-यांवरच ठिय्या मांडला व बॅँकेत जाणा-या येणा-यांची वाट अडवली. यावेळी बॅँकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून गरीब शेतक-यांकडून केली जात असलेल्या सक्तीच्या वसुलीला विरोध दर्शविण्यात आला. सुमारे तासभर ठिय्या मांडल्यानंतर बॅँकेच्या पदाधिकाºयांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी पाचारण केले. यावेळी शासनाने दुष्काळी भागातील शेतकºयांची सक्तीची वसुली रोखण्याचे आदेश असताना बॅँकेचे कर्मचारी शेतकºयांना कर्जवसुलीच्या नोटिसा तसेच जप्तीची मोहीम राबवित असल्याबद्दल जाब विचारण्यात आला. राज्यातील अन्य बॅँकांना सहकार विभागाकडून आर्थिक मदत केली जात असताना नाशिक जिल्हा बॅँकेलाही सुमारे अडीचशे कोटींची मदत करण्यात यावी, सक्तीने वसुली केल्यास शेतक-यांकडून ते हाणून पाडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे हंसराज वडघुले, नाना बच्छाव, संजय पाटोळे, साहेबराव मोरे, विठ्ठल कोरडे, प्रकाश चव्हाण, भाऊसाहेब तासकर आदींनी दिला. यावेळी बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर, शिरीष कोतवाल, संदीप गुळवे, गणपत पाटील आदी उपस्थित होते. बॅँकने तूर्त वसुली थांबविण्याचे तोंडी आश्वासन दिले. त्यानंतर स्वाभिमानी संघटनेने जिल्हा निबंधकांच्या कार्यालयाबाहेरही घोषणाबाजी करून आंदोलन केले.

टॅग्स :bankबँकNashikनाशिक