शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात २५ पासून जिल्हाबंदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 00:25 IST

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार नाशिकला बुधवारी (दि. २५) सकाळी ६ पासून जिल्हाबंदी लागू करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्णात संचारबंदी लागू करण्यात आली असून, केवळ जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठीच घराबाहेर पडण्याची परवानगी असून, अन्य नागरिकांनी ३१ मार्चपर्यंत घरातच राहणे बंधनकारक असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासन : पंपांवर दुचाकीला १००, चारचाकीला १००० रुपयांचे पेट्रोल

नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार नाशिकला बुधवारी (दि. २५) सकाळी ६ पासून जिल्हाबंदी लागू करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्णात संचारबंदी लागू करण्यात आली असून, केवळ जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठीच घराबाहेर पडण्याची परवानगी असून, अन्य नागरिकांनी ३१ मार्चपर्यंत घरातच राहणे बंधनकारक असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेतील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भुजबळांनी ही माहिती दिली. नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना आणि बाहेरच्या नागरिकांना नाशिकमधून बाहेर किंवा बाहेरच्यांना जिल्ह्यात येण्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात येणार आहे. तसेच शासन आदेशानुसार रिक्षात चालकाव्यतिरिक्त केवळ एक प्रवासी, तर कारमध्ये केवळ दोन प्रवाशांनाच परवानगी दिली जाणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता किरकोळ कारणांसाठी शहरात फिरणाºया वाहने व लोकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असेही भुजबळ म्हणाले. तसेच पेट्रोल पंपांवर दुचाकींना एकावेळी १०० रुपये, तर चारचाकींना केवळ १००० रुपयांचे पेट्रोल देण्याचे आदेश देण्यात आले असून पेट्रोल पंप हे सकाळी ८ ते ५ या वेळेतच सुरू ठेवले जातील. धार्मिक स्थळावर कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नीलेश सागर उपस्थित होते.जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणारअन्न, धान्य, भाजीपाला, मेडिकल या सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने नियमितपणे सुरू राहणार आहेत. जनतेने केवळ तिथे गर्दी करू नये. बाजार समितीत तसेच भाजीपाला विक्र ीसाठी जागा निश्चित करून भाजीपाला खरेदीसाठी लोकांची गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. वैद्यकीय सेवा सुविधांसाठी सुरू असलेल्या वाहतूक करणाºया वाहनांना सेवेची मुभा राहणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसPetrolपेट्रोल