नाशिक : जिल्हा बॅँकेच्या कर्जवसुलीत नाशिक तालुक्यातील गिरणारे येथील ३१ सभासदांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्याने तिचा येत्या आठवडाभरात लिलाव करण्याची तयारी सुरू करण्यात आली असून, गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत ग्रामीण भागात कर्जदारांकडून वसुली करणाºया महिला अधिकारी व कर्मचाºयांचा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. गुरुवारी इगतपुरी व नाशिक तालुक्यातील कर्जवसुलीची आढावा बैठक घेण्यात आली, त्यात प्रामुख्याने राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत दीड लाखांहून अधिक कर्ज असलेल्या कर्जदारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे व विशेष करून अशा कर्जदारांपर्यंत कर्मचारी, अधिकाºयांनी पोहोचावे अशा सूचना देण्यात आल्या. अशा कर्जदारांची यादी बॅँकेच्या मुख्यालयात जमा करण्यात यावी, त्यांच्याशी आपण स्वत: संपर्क साधून विनंती करणार असल्याचे अध्यक्ष केदा अहेर यांनी सांगितले. फार्म हाऊस थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. नाशिक तालुक्यातील गिरणारे येथील ३१ सभासदांची स्थावर मालमत्ता जप्तीबाबत वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आल्याने त्याचेही लवकरात लवकर लिलाव करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीस संचालक संदीप गुळवे हे देखील उपस्थित होते.
जिल्हा बॅँक : महिला वसुली अधिकाºयांचा सत्कार ३१ मालमत्तांचा लवकरच लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:44 IST
नाशिक : जिल्हा बॅँकेच्या कर्जवसुलीत नाशिक तालुक्यातील गिरणारे येथील ३१ सभासदांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्याने तिचा येत्या आठवडाभरात लिलाव करण्याची तयारी सुरू करण्यात आली.
जिल्हा बॅँक : महिला वसुली अधिकाºयांचा सत्कार ३१ मालमत्तांचा लवकरच लिलाव
ठळक मुद्देदीड लाखांहून अधिक कर्ज असलेल्या कर्जदारांना योजनेचा लाभ थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याच्या सूचना