शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 17:15 IST

कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरीप पिक कर्ज वाटपाची गती संथावली आहे. जिल्हा बँक वगळता इतर बँकांमध्ये कर्जवाटप केवळ नावलाच आहे. महात्मा फुले कृषी कर्जमाफी रखडल्याने शेतकऱ्यांना कर्जाचा परतावा करणेही शक्य न झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर थकबाकी दिसत असल्याने अडचणी वाढल्या आहेत.

ठळक मुद्देकळवण : राष्ट्रीयकृत बँकाकडून मात्र टाळाटाळ

कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरीप पिक कर्ज वाटपाची गती संथावली आहे. जिल्हा बँक वगळता इतर बँकांमध्ये कर्जवाटप केवळ नावलाच आहे. महात्मा फुले कृषी कर्जमाफी रखडल्याने शेतकऱ्यांना कर्जाचा परतावा करणेही शक्य न झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर थकबाकी दिसत असल्याने अडचणी वाढल्या आहेत.एप्रिलपासून सुरु झालेल्या कर्जवाटपात केवळ जिल्हा बँकेने आघाडी घेतली आहे. कोरोना संकटात संपूर्ण जग लॉकडाऊन असताना शेती मात्र अनलॉक होती. जास्तीत जास्त शेतकºयांना पीककर्ज उपलब्ध होण्यासाठी पीककर्ज योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत, ग्रामीण, खाजगी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप करण्याच्या सूचना शासनाने दिल्या असल्या तरी कर्ज देतांना राष्ट्रीयकृत बँकानी अडचणींचा डोंगर शेतकºयांपुढे उभा करु न चकरा मारण्यात वेळ घालवला गेला. यंदाच्या खरीप हंगामात एकूण ४६००० हेक्टर क्षेत्रात ९५ टक्के खरीपाची पेरणी झाली आहे.तालुक्यात अन्नधान्याचे क्षेत्र ३८३६४ हेक्टर असून २२११६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली असून तालुक्यात गळीत धान्य क्षेत्र ७८७६ हेक्टर क्षेत्र असून तालुक्यात ९७९७ हेक्टर क्षेत्रात १२५ टक्के पेरणी झाली आहे.तालुक्यात जिल्हा बँकेने आपल्या १० शाखांच्या माध्यमातून शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध करु न दिले. १८३ जनरल सभासदांना २ कोटी १७ लाख ५४ हजाराचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. ६५५ अल्प सभासदांना ३ कोटी ४० लाख रु पये असे एकूण ८३८ सभासदांना ५ कोटी ५७ लाख रूपयांचे पीक कर्ज वाटप केले. बँक आॅफ महाराष्ट्र, कळवण, देसराने, अभोणा, कनाशी, ओतूर, बेज शाखा तसेच कॅनरा बँक नांदुरी, युनियन बँक कळवण व स्टेट बँक कळवण, अभोणा शाखा व एच डी एफ सी कळवण शाखा यांनी पीक कर्ज वाटप केले आहे.जिल्हा बँकेपेक्षा राष्ट्रीयीकृत बॅँकामधून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रि या किचकट असल्याने शेतकरी या बँकामध्ये जाणे टाळतात.मात्र जिल्ह्यात काही ठिकाणी जिल्हा बँकेची शाखा नसल्याने शेतकºयांना राष्ट्रीयकृत बँकात जावे लागते.मात्र या बँकाकडून शेतकºयांना विविध कागदपत्रांची मागणी तसेच एकाच कामासाठी वांरवार पायपीट करण्यास भाग पाडले जाते.त्यामुळे शेतकरी वैतागून पीक कर्जाची उचलच करीत नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक