शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेच्या ताब्यात पाऊण कोटींच्या चार मालमत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:17 IST

नाशिक : शेतकऱ्यांची कर्जमाफी व तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या नोटबंदीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या जिल्हा बॅँकेने हाती घेतलेल्या थकबाकी वसुली मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळू लागला असून, थकबाकीदारांना तगादा लावून वसुली करण्याबरोबरच कायदेशीर मार्गाचा अवलंब करीत त्यांच्या मालमत्ता ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून पाऊण कोटी रुपये किमतीच्या चार मालमत्ता जिल्हा बॅँकेच्या मालकीच्या झाल्या आहेत.

ठळक मुद्देथकबाकीदारांकडून वसूल : मालमत्तेच्या सदरी बॅँकेचे नाव

नाशिक : शेतकऱ्यांची कर्जमाफी व तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या नोटबंदीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या जिल्हा बॅँकेने हाती घेतलेल्या थकबाकी वसुली मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळू लागला असून, थकबाकीदारांना तगादा लावून वसुली करण्याबरोबरच कायदेशीर मार्गाचा अवलंब करीत त्यांच्या मालमत्ता ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून पाऊण कोटी रुपये किमतीच्या चार मालमत्ता जिल्हा बॅँकेच्या मालकीच्या झाल्या आहेत.जिल्हा बँकेची आर्थिक परिस्थिती बिकट असून, ठेवीदारांना त्यांचे ठेवीचे पैसे देण्यास अडचण निर्माण होण्याबरोबरच कर्मचाऱ्यांचे वेतनदेखील वेळेवर होत नाही. शासनाने केलेली नोटाबंदी व त्यापाठोपाठ शेतकºयांची कर्जमाफीमुळे बॅँक अडचणीत आली असली तरी, सुमारे दोन हजार कोटींहून अधिक रक्कम थकबाकीदारांकडे थकीत आहे. या थकबाकीदारांकडून वसुलीशिवाय पर्याय नसल्याचे पाहून जिल्हा बॅँकेने थकबाकीदारांकडून सक्तीची वसुली सुरू केली असून, त्यासाठी विविध क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, वाहने जप्त करून लिलाव करणे, याचबरोबर सहकार विभागाच्या मदतीने थकबाकीदारांनी तारण ठेवलेल्या मालमत्तांचे मूल्यांकन करून त्या वसुलीसाठी दावे दाखल केले तसेच महसूल खात्याच्या माध्यमातून या मालमत्तांवर जिल्हा बॅँकेचे नावे लावून घेतली आहेत.बँकेच्या या कारवाईमुळे काही थकबाकीदारांनी पैसे भरण्यास सुरुवात केली असून, ज्यांनी बॅँकेला प्रतिसाद दिला नाही त्यांच्या मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव केला. तथापि, बºयाच थकबाकीदाराच्या मालमत्तेचे तीन वेळेस जाहीर लिलाव व फेरलिलाव पुकारून ही लिलावात बोली लावण्यास कोणीही पुढे न आल्यामुळे अखेर जिल्हाबँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम १०० अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम ८५ अन्वये विभागीय सहनिबंधकांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर करून लिलावातील मालमत्तेवर थकबाकीदाराचेनाव कमी करून भोगवटादारसदरी बॅँकेचे नाव लावण्यात आले आहे. बँकेने ताब्यात घेतलेल्या मालमत्ताजिल्हा बँकेने ताब्यात घेतलेल्या मालमत्तांमध्ये मे पांडुरंग मिल्क प्रोड््क्टस, (चिंचगव्हाण, मालेगाव). महेंद्रसिंग दला पवार, सुभद्राबाई दला पवार व भूषण महेंद्रसिंग दला पवार यांच्या संयुक्त मालकीची मिळकत. मे साई दूध डेअरी, (सीताने, मालेगाव) निंबा सीताराम भामरे, सुनंदा निंबा भामरे व गंगाबाई सीताराम भामरे, श्री कृष्ण डेअरी फार्म (पळशी, नांदगाव), विलास शांताराम सांगळे, वर्षा मिल्क प्रोड््क्टस (बोराळे, नांदगाव), सुभाष दगा पाटील व किरण सुभाष साळुंखे पाटील यांचा समावेश आहे.