शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेला ‘समृद्धी’ पावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:18 IST

जिल्हा बॅँकेने थकबाकीदार सभासदांकडील कर्जवसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतली असताना त्याला प्रस्तावित समृद्धी महामार्गाचीही चांगलीच जोड मिळाली असून, बॅँकेकडे कर्जासाठी तारण ठेवलेली जमीन समृद्धी महामार्गासाठी देताना त्यावरील बोजाची रक्कम थेट जिल्हा बॅँकेत वर्ग करण्यात आल्याने जिल्हा बॅँकेला सिन्नर तालुक्यात समृद्धी महामार्ग चांगलाच पावला आहे.

नाशिक : जिल्हा बॅँकेने थकबाकीदार सभासदांकडील कर्जवसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतली असताना त्याला प्रस्तावित समृद्धी महामार्गाचीही चांगलीच जोड मिळाली असून, बॅँकेकडे कर्जासाठी तारण ठेवलेली जमीन समृद्धी महामार्गासाठी देताना त्यावरील बोजाची रक्कम थेट जिल्हा बॅँकेत वर्ग करण्यात आल्याने जिल्हा बॅँकेला सिन्नर तालुक्यात समृद्धी महामार्ग चांगलाच पावला आहे.  मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या थेट जमिनी खरेदी केल्या जात असून, त्यासाठी बाजारभावाच्या पाचपट दर देण्यात आल्याने आजवर सिन्नर व इगतपुरी या दोन्ही तालुक्यांतून सुमारे ५६ टक्के जमिनीची खरेदी करण्यात येऊन त्यापोटी ६७४ कोटी रुपये जागामालक शेतकºयांच्या बॅँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. यात काही शेतकºयांच्या जमिनीवर जिल्हा बॅँकेचा पीक कर्जाचा बोजा चढ विण्यात आला आहे, तर काहींनी शेतजमिनी तारण ठेवून बॅँकेकडून कर्ज घेतले आहे.  राज्यातील शेतकºयांना शासनाने कर्जमाफी जाहीर केली, तर ज्या शेतकºयांकडे दीड लाखापेक्षा अधिक रक्कम थकली आहे त्यांच्या विरोधात जिल्हा बॅँकेने वसुली मोहीम हाती घेतली आहे. यात प्रामुख्याने समृद्धी महामार्गासाठी जागा जात असलेल्या शेतकºयांचाही समावेश आहे. ज्या शेतकºयाच्या जमिनीवर बॅँकेचा बोजा चढला आहे किंवा ज्यांनी शेत तारण ठेवून कर्ज घेतले आहे अशा शेतकºयांना समृद्धी महामार्गाचा मिळालेला मोबदला जिल्हा बॅँकेने कर्जापोटी वर्ग करून घेतला आहे. सिन्नर तालुक्यात अशा प्रकारे तीन कोटी ४१ लाख रुपये जिल्हा बॅँकेच्या खात्यात वळते करण्यात आले आहेत. अजून जवळपास ५० टक्के जमिनीची खरेदी शिल्लक आहे.तीन कोटी ४१ लाख रुपये मिळालेसिन्नर व इगतपुरी तालुक्यातील ज्या ४९ गावांमधून समृद्धी महामार्ग जात आहे त्या जागामालक शेतकºयांकडून जिल्हा बॅँकेला सुमारे १५ कोटी रुपये घेणे आहे. त्यातून एकट्या सिन्नर तालुक्यातून तीन कोटी ४१ लाख रुपये मिळाले असून, इगतपुरी तालुक्यातूनही दीड ते दोन कोटी रुपये मिळाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेच्या वसुलीला चांगलाच हातभार लागला आहे.

टॅग्स :bankबँक