सटाणा : नाशिक जिल्हा वकील फेडरेशनच्या अध्यक्षपदी बागलाण तालुका वकीलसंघाचे अध्यक्ष अॅड. पंडितराव भदाणे यांची बहुमताने निवड करण्यात आली.निफाड येथे नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील सर्व वकीलसंघांच्या अध्यक्षांच्या बैठकीत ही निवड झाली असून, राज्यातील पहिल्या वकील फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड होण्याचा बहुमान अॅड. भदाणे यांनी मिळविला आहे. बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाचे अध्यक्ष अॅड. अविनाश भिडे व माजी अध्यक्ष अॅड. जयंत जायभावे उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील सर्व वकील संघांच्या अध्यक्षांनी जिल्हाध्यक्षपदी अॅड. पंडितराव भदाणे यांच्या नावावर सर्वानुमते मंजुरी दिली. यावेळी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठाकरे, नाशिकरोडचे अध्यक्ष सुदाम गायकवाड, इगतपुरीचे अध्यक्ष संजय जाधव, निफाडचे अंबादास आवाडे, चांदवडचे अॅड. दिनकर ठाकरे, मालेगावचे अध्यक्ष आर. के. बच्छाव, कळवणचे अध्यक्ष संजय पवार आदींसह सर्व तालुक्यांच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष उपस्थित होते.
जिल्हा वकील फेडरेशनच्या अध्यक्षपदी भदाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:15 IST