शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 01:03 IST

औरंगाबादसह मराठवाड्यात मराठा क्रांती आंदोलनाला हिंसक वळण लागलेले असल्याने नाशिकमध्येही सकल मराठा समाजातर्फे बुधवारी (दि.२५) नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

नाशिक : औरंगाबादसह मराठवाड्यात मराठा क्रांती आंदोलनाला हिंसक वळण लागलेले असल्याने नाशिकमध्येही सकल मराठा समाजातर्फे बुधवारी (दि.२५) नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सर्व प्रांताधिकारी व तहसीलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पोलीस प्रशासनाच्या मदतीने मिळणाऱ्या गुप्त सूचनांच्या आधारे रात्री उशिरापर्यंत खबरदारीची उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (दि.२४)  दिली.  नाशिक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलनाची तयारी करून जिल्हा बंदची हाक दिली असल्याची माहिती नाशिक जिल्हा प्रशासनाला गोपनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व प्रांताधिकाºयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.  तसेच नाशिक बंद आणि औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या आक्रमक आंदोलनामुळे औरंगाबाद-नाशिक बससेवा बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या असून, नाशिक जिल्ह्यातही ज्या भागात आक्रमक आंदोलन होईल त्या भागातील बससेवा बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्याचे समजते.गोदावरी नदीकिनारी जीवरक्षक तैनातराज्यभरात मराठा क्रांती मोर्चाचे आक्रमक आंदोलन सुरू असताना मंगळवारी नाशिकमध्येही एका तरुणाने गोदावरी पात्रात उतरून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, गोदावरी परिसरात १० जीवरक्षक पथक तैनात केले आहेत. प्रत्येक पथकात दोन अशा एकूण २० जवानांना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी लाइफ जॅकेटसह सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा