शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात पाठ्यपुस्तकांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:58 IST

पेठ : कोरोना संसर्गामुळे या वर्षीचा शाळेचा पहिला दिवस शाळेऐवजी मुलांचा शेतात घरच्या माणसांना मदत करण्यात गेला. पेठ तालुक्यात पहिल्या दिवशी एकही शाळा उघडली नसली तरी तालुकास्तरा-वरून केंद्रनिहाय मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

पेठ : कोरोना संसर्गामुळे या वर्षीचा शाळेचा पहिला दिवस शाळेऐवजी मुलांचा शेतात घरच्या माणसांना मदत करण्यात गेला. पेठ तालुक्यात पहिल्या दिवशी एकही शाळा उघडली नसली तरी तालुकास्तरा-वरून केंद्रनिहाय मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.कोरोनासंदर्भात पेठ तालुका ग्रीन झोनमध्ये असला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाचा धोरणात्मक निर्णय येईपर्यंत शाळा सुरू न करण्याचा कल पालकांसह प्रशासनाचा असल्याने तूर्तास मुलांना शाळेत बोलवू नये, असे सांगण्यात आले.मात्र शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रशासकीय यंत्रणा व मोजक्या शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तके पोहच करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.बहुतांश शाळांमध्ये पाहिल्या दिवशी शाळेत हजेरी लाऊन स्वत:च शाळांची स्वच्छता करून घेतली. ग्रामीण भागात पालकांसह विद्यार्थी शिक्षकांकडे शाळा सुरू करण्याबाबत विचारणा करताना दिसून येत होते. सध्या पेरणी व शेतकामाचे दिवस असल्याने तालुक्यात बहुतांश विद्यार्थी पहिल्या दिवशी शिवारातच दिसून आले.

-------------------------------------प्राथमिक शाळांमध्ये सॅनिटायझर फवारणीकळवण : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये आज सर्वत्र स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले. कळवण नगरपंचायतने शहरातील प्राथमिक शाळा सॅनिटायझर करून शाळा परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या. कळवण खुर्द येथील प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामचंद्र शिंदे यांनी स्वखर्चाने स्वत:च्या ट्रॅक्टर व ब्लोअरच्या मदतीने सॅनिटायझर केली. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके देण्याचा शासन निर्णय असल्यामुळे मुख्याध्यापकांना पाठ्यपुस्तके वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तालुक्यात मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके वाटप करीत शाळा परिसर व पाण्याची टाकी स्वच्छता केली. विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षणासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केले असून, विद्यार्थ्यांचे आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या गूगल लिंकने भरून प्रवेश देणे सुरू असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक