शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या दहा शाळांना टॅबचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 19:11 IST

गेल्या आठवड्यातच जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन डिजिटल स्कूलचे सादरीकरण केले होते. सीएसआरच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शंभर शाळांमध्ये टप्पाटप्प्याने हा प्रयोग राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देडिजिटलकडे वाटचाल : इंग्रजी, गणित शिकवणारप्रत्येकी ४० याप्रमाणे ४०० टॅबचे वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नालंदा प्रोजेक्टच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या दहा शाळांना चारशे टॅबचे वाटप जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता तिसरी ते सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व गणित विषयाच्या अभ्यासक्रमाचा टॅबमध्ये समावेश असून, प्रत्येक विद्यार्थ्याला सदरचा टॅब हाताळण्यास मिळणार आहे.

गेल्या आठवड्यातच जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन डिजिटल स्कूलचे सादरीकरण केले होते. सीएसआरच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शंभर शाळांमध्ये टप्पाटप्प्याने हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. नालंदा प्रोजेक्टने पहिल्या टप्प्यात चारशे टॅब उपलब्ध करून दिले असून, त्याचे वाटप जिल्ह्यातील दहा सेमी इंग्रजीच्या शाळांना करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या एका सोहळ्यात शिक्षण सभापती यतिन पगार, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या उपस्थितीत सदर शाळेचे मुख्याध्यापक व गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या ताब्यात टॅब, चार्जिंग सर्किट व एक लॅपटॉप साहित्य सुपुर्द करण्यात आले. डिजिटल शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यासाठी सुमारे बाराशे शाळांनी तशी तयारी दर्शविली होती. त्यातून ३६० शाळांची निवड करण्यात आली. शिक्षणाधिकारी व शिक्षणतज्ज्ञांकडून या शाळांना प्रत्यक्ष भेट देण्यात आली व त्यातून ३० शाळा अंतिम निवडीसाठी पात्र ठरविण्यात आल्या त्यातूनही फक्त दहा शाळांची निवड करण्यात आली. या दहा शाळांना प्रत्येकी ४० याप्रमाणे ४०० टॅबचे वाटप करण्यात आले. डिजिटल शिक्षणाविषयी अगोदर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, या टॅबमध्ये इयत्ता तिसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला असून, तासिकेनुसार टप्पाटप्प्याने वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनाही तो एकाच दिवसात वापरता येणार आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात टॅबच्या हाताळणीविषयी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी गणित मित्र वाल्मीक चव्हाण यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :Educationशिक्षणnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद