शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सुविचार मंच या संस्थेच्या वतीने ‘सुविचार गौरव’चे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:13 IST

साहित्यनगरी म्हणून नाशिकची ओळख असली तरी येथील गोदाकाठावरून राज्याला सातत्याने विविध रत्ने मिळाली आहेत. गोदाकाठावर ‘रत्नां’ची खाण आहे. राज्यासाठी अन् देशासाठी प्रतिनिधित्व करण्यासारखी रत्ने संभाव्य काळातही नाशिकनगरीत मोठ्या संख्येने विकसित होतील, असे अनुकूल वातावरण येथे आहे यात तिळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

नाशिक : साहित्यनगरी म्हणून नाशिकची ओळख असली तरी येथील गोदाकाठावरून राज्याला सातत्याने विविध रत्ने मिळाली आहेत. गोदाकाठावर ‘रत्नां’ची खाण आहे. राज्यासाठी अन् देशासाठी प्रतिनिधित्व करण्यासारखी रत्ने संभाव्य काळातही नाशिकनगरीत मोठ्या संख्येने विकसित होतील, असे अनुकूल वातावरण येथे आहे यात तिळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. सुविचार मंच या संस्थेच्या वतीने सोमवारी (दि.१३) रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित ‘सुविचार गौरव’ पुरस्कार वितरण सोहळ्यात चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक खुटाडे यांच्यासह पुरस्कारार्थींमध्ये अभिनेता स्वप्नील जोशी, अभिजित खांडकेकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी चव्हाण म्हणाले, यशोशिखर सर करण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज असते. त्यामुळे जीवनात ठरविलेले ध्येय साध्य करताना येणाऱ्या संकटांमुळे खचून जाऊ नये. जिद्दीने त्यावर मात करावी आणि आपले ध्येय साध्य करावे, असे आवाहन त्यांनी तरुणाईला केले.दरम्यान, विनायकदादा यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले, समाजातून प्रेरणादायी कर्तृत्वान माणसे हेरणे आणि त्यांची पुन्हा समाजापुढे पेरणी करणे हे अत्यंत अवघड असे काम आहे, हे काम ही संस्था लीलया पार पाडत असून ही अत्यंंत कौतुकास्पद बाब आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक, कला, क्रीडा, साहित्य, शैक्षणिक, वैद्यकीय, उद्योग या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया व्यक्तींना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी केले. सूत्रसंचालन आकाश पगार यांनी केले.असे आहेत पुरस्कारार्थीमाजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांना मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अभिनेता स्वप्नील जोशी, अभिजित खांडकेकर, डॉ. रवींद्र सपकाळ, डॉ. आशुतोष साहू, दीपक बागड, डॉ. विनोद गोरवाडकर, क्रि केटपटू माया सोनवणे, विश्वास ठाकूर यांनाही ‘सुविचार गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक