शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व ज्योतिषशास्त्रात विशेष योगदान देणाºया शिवपार्वती प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 01:22 IST

नाशिक : सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व ज्योतिषशास्त्रात विशेष योगदान देणाºया पाच मान्यवरांचा शनिवारी (दि़३) पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला़

ठळक मुद्देवैदिक पुरस्कार अनिल महाराज जोशी यांना आध्यात्मिक पुरस्कार डॉ़ बाबासाहेब तराणेकर यांना

नाशिक : सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व ज्योतिषशास्त्रात विशेष योगदान देणाºया पाच मान्यवरांचा शनिवारी (दि़३) पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला़ गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुलमधील कूर्तकोटी सभागृहात स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्या हस्ते पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती आध्यात्मिक पुरस्कार डॉ़ बाबासाहेब तराणेकर (इंदूर), पुण्यश्लोकश्रीराम पराडकर वैदिक पुरस्कार नाशिक येथील अनिल महाराज जोशी, नंदलाल जोशी वेदवेदांग पुरस्कार नाशिक येथील विनायकशास्त्री दाणी, शंकर हरी औरंगाबादकर शैक्षणिक पुरस्कार पुणे येथील पंडित जकातदार यांना, तर सर डॉ़ आप्पासाहेब गोसावी लोकसेवा पुरस्कार नागपूर येथील डॉ़ एस़ टी़ देशमुख यांना प्रदान करण्यात आला़ प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ़ मो़ स़ गोसावी यांनी सांगितले की, कर्मकांडातून भारतीय संस्कृतीला बाहेर काढायचे असेल विज्ञानाची कास धरावी लागेल व त्यासाठी शिक्षण हे एकमेव हत्यार आहे़ मात्र सद्यस्थितीत परीक्षार्थी जास्त असल्याने यामध्ये विकासाची व संस्थात्मक कामाची तसेच समुपदेशनाची गरज असल्याचे सांगून गोसावी यांनी ४० वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला़ पुरस्कारप्राप्त अनिल जोशी यांनी शिवपार्वती प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करून मनोगतामध्ये, लहान मुलांवर सुसंस्कार करण्याची गरज असल्याचे सांगितले़ तर पुरस्कारार्थी जकातदार यांनी, सध्याची मोबाइलची पिढी ही पालकांना अत्यवस्थ करीत असून, या पिढीला समुपदेशनाची आवश्यकता असल्याचे सांगितले़ त्यासाठी ज्योतिषशास्त्राऐवजी तर्कशास्त्राचा उपयोग करणे हिताचे असून अ‍ॅस्टॉकौन्सिलर ही संज्ञा या पिढीमध्ये समाजात रुजणे गरजेचे असल्याचे सांगितले़ यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवज्योती या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले़ यावेळी सेवाव्रती अनुबंधी दम्पती, आदर्श संस्था पुरस्कार, वैदेही सर्जनशीलता पुरस्कार, गुणवंत व प्रज्ञावंत यांचा गौरव करण्यात आला़ सूत्रसंचालन मुग्धा जोशी यांनी केले़ डॉ़ के. आऱ शिंपी यांनी आभार मानले़ यावेळी सुनंदाताई गोसावी, कल्पेश गोसावी, डॉ़ दीप्ती देशपांडे, प्राचार्य, कर्मचारी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी व अध्यक्ष स्वामिनी स्थितप्रज्ञानंद यांनी आपल्या भाषणात मानवाने आपले कर्म हे फळाची अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने केले पाहिजे़ निरपेक्ष भावनेने केलेल्या सामाजिक कार्यामुळे मानवाचे जीवन आनंदमय होत असल्याचे स्वामिनी म्हणाल्या़ यावेळी त्यांनी शिवपार्वती प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक केले़