शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडून शहीद गोसावी कुटुंबियांचे सांत्वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 17:44 IST

सिन्नर : जम्मू-काश्मीर मध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात वीरमरण आलेल्या शिंदेवाडी (श्रीरामपूर ) येथील जवान नायक केशव गोसावी यांच्या कुटुंबियांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित यांनी भेट घेऊन सांत्वन केले. शहीद केशव यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

सिन्नर : जम्मू-काश्मीर मध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात वीरमरण आलेल्या शिंदेवाडी (श्रीरामपूर ) येथील जवान नायक केशव गोसावी यांच्या कुटुंबियांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित यांनी भेट घेऊन सांत्वन केले. शहीद केशव यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.गोसावी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व शहीद केशव यांचे वडील सोमिगरी हे अपंग असल्याने त्यांच्या नावे जिल्हा परिषदेच्या सेसमधून घरकुलासाठी अर्थसहाय्य करण्यात येईल असे सांगून समाजकल्याण विभागाकडे यासंबंधीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा असे आदेश अध्यक्ष सांगळे यांनी गटविकास अधिकाºयांना दिले. शहीद केशव यांच्या निवासस्थानी सांगळे, गावित यांनी वीरपिता सोमिगरी गोसावी, वीरपत्नी यशोदा यांची भेट घेतली. यशोदा यांनी नाजूक परिस्थितीत समोर आलेल्या अकल्पित संकटाचा धीरोदात्तपणे सामना केला. यापुढील काळात तब्बेतीची काळजी घेऊन शहीद केशव यांचे कुटुंबाप्रती असणारे जबाबदारीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे सांगून संपूर्ण तालुका व जिल्हा या दु:खात गोसावी कुटुंबासोबत असल्याची ग्वाही सांगळे यांनी दिली.गोसावी कुटुंब राहत असलेल्या घराची अवस्था पाहून ६५ टक्के अपंग असणाºया सोमिगरी गोसावी यांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या ३ टक्के अपंग कल्याण निधीतून नवीन घरकुल बांधण्यासाठी अनुदान देण्याची घोषणा त्यांनी केली. पंचायत समितीचे याबाबतचा प्रस्ताव तातडीने जिल्हा परिषदेकडे सादर करावा असे आदेश त्यांनी समवेत असलेल्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांना दिले. ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय गिरी, शिंदेवाडीचे ग्रामसेवक प्रमोद शिरोळे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गोकुळ नरोडे, गटप्रमुख दशरथ हंडोरे, दिलीप हांडोरे, पप्पू शेख, बाबासाहेब कोकाटे, एकनाथ हंडोरे, वाल्मीक हांडोरे, गणेश बिरे, योगेश हांडोरे, धनंजय अंधारे यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 

टॅग्स :Nashikनाशिक