गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांच्या आयुष्याला योग्यदिशा देणे हेच अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे उद्दिष्ट असून, त्यात संस्था कुठेही कसूर करणार नाही असे संस्थेचे अध्यक्ष अशोक कटारिया यांनी सांगितले. संस्थेचे सचिव श्रीकांत शुक्ल, डॉ. डी. एम. गुजराथी यांनीही मनोगत व्यक्त केले.
अशोका एज्युकेशन फाउंडेशनच्या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत यावर्षी लॅपटॉप मिळविण्याचा मान जस्टिन जोस, मूझेन कोकणी, पौर्णिमा जोशी, विक्रांत खैरनार, ऐश्वर्या पवार यांनी मिळवला. 'अकॅडमिक टॉपर स्कॉलरशीप ' या गटात बॅच २०१८-२० साठी केतकी पटणी, विधी ठक्कर, केतकी वेदविख्यात यांना, तर बॅच २०१९-२१ साठी (प्रथम वर्ष) यात सृष्टी जैन, श्वेता चोरडिया, सुशीला लोंगाणी यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. यात महाविद्यालयात प्रथम येणाऱ्यास दहा हजार, द्वितीय येणाऱ्यास साडेसात हजार, तर तृतीय क्रमांक मिळवणाऱ्यास पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. 'अशोका मेरिटोरियस स्कॉलरशीप' या गटात यश पमनानी, निधी मिश्रा, दीपू बिनॉय, सौरभ तिवारी यांना, तर अशोका संस्थेअंतर्गत प्रवेश घेणाऱ्या ऐश्वर्या चावला, फ्रेयान ईराणी, शिल्पा सिंग यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. गेल्या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन माध्यमातून वर्ग घेण्यात आले त्यातही सर्वांत अधिक हजेरी असणाऱ्या पल्लवी अरिंगळे हिला पाच हजार रुपये प्रोत्साहन म्हणून देण्यात आले. (वा.प्र.)
(१७ अशोका फोटो)
===Photopath===
170521\17nsk_39_17052021_13.jpg
===Caption===
अशोका बिझनेस स्कूलतर्फे शिष्यवृत्ती वितरण.