शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भगूरला रेशनमध्ये निकृष्ट धान्याचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:34 IST

भगूर येथील स्वस्त धान्य दुकानातून गेल्या काही महिन्यांपासून दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट दर्जाच्या गव्हाचे वाटप केले जात असून, या संदर्भात तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

भगूर : भगूर येथील स्वस्त धान्य दुकानातून गेल्या काही महिन्यांपासून दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट दर्जाच्या गव्हाचे वाटप केले जात असून, या संदर्भात तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात दुकानदाराने पुरवठा खात्याकडूनच खराब धान्याचा पुरवठा केला जातो, असा पवित्रा घेतला आहे तर पुरवठा खात्याने खराब धान्य दिले जात नाही, असे सांगून या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.भगूर धान्य दुकान क्रमांक ६७ मधून गेल्या ९ ते १० महिन्यांपासून पिवळी शिधापत्रिकाधारक दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना वाटप करण्यात येणारा गहू व तांदूळ अतिशय निकृष्ट असून, गव्हामध्ये खडे व काड्यांचे प्रमाण अधिक असून, काही ठिकाणी धान्याला कीड लागून जाळे लागले आहे. तांदूळदेखील कण्यांचा व खड्यांचा असल्याचे शिधापत्रिकाधारकांचे म्हणणे आहे. सुरुवातीला काही महिने   धापत्रिकाधारकांनी धान्याकडे दुर्लक्ष केले, परंतु सातत्याने खराब धान्याचे वितरण केले जात असून, गरीब कुटुंबीयांना दोन रुपये दराने गहू व तीन रुपये दराने तांदूळ मिळत असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता धान्य घेण्याशिवाय पर्याय नाही. भगूर शहरात चार स्वस्त धान्य दुकाने असून, त्यातील काही दुकानांत गहू, तांदूळ, तूरडाळ, उडीदडाळ, साखर बऱ्यापैकी मिळत असले तरी, काही दुकानांतून मात्र निकृष्ट दर्जाचे धान्याचे वाटप केले जाते. या संदर्भात दुकानदारांकडे तक्रार केल्यास शासनाकडूनच निकृष्ट दर्जाचे धान्य पुरविले जात असल्यामुळे दुकानदार काहीच करू शकत नसल्याचे सांगत आहे. यासंदर्भात दुकान क्रमांक ६७चे वितरक विरुभाई आहुजा यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, पुरवठा विभागाकडून गेल्या काही महिन्यांपासून खराब धान्याचा पुरवठा केला जात असून, अजूनही माझ्याकडे तीन कट्टे पडले आहेत. त्यातही चांगले धान्य देण्याचा प्रयत्न करीत आहे.शहर धान्य पुरवठा अधिकारी अनिल पुरे यांनी, खराब धान्याचा पुरवठा केला जात नसल्याचा दावा करून, जर रेशन दुकानदारांना खराब धान्य आले असेल तर त्यांनी वाटप न करता त्यांनी पुरवठा कार्यालयात धान्य जमा करावे, असे सांगून खराब धान्याची चौकशी केली जाईल असे सांगितले. त्यानुसार पुरवठा निरीक्षकांना चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक