शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बलिप्रतिपदादिनी विद्रोहीरत्न पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:53 IST

बलिप्रतिपदा सणाचे औचित्य साधून शहरातील विविध पुरोगामी संघटनांनी एकत्र येत समाजासाठी झटणाऱ्या आणि प्रबोधन करणाºया मान्यवरांना विद्रोहीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले.

नाशिक : बलिप्रतिपदा सणाचे औचित्य साधून शहरातील विविध पुरोगामी संघटनांनी एकत्र येत समाजासाठी झटणाऱ्या आणि प्रबोधन करणाºया मान्यवरांना विद्रोहीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले.हुतात्मा स्मारक येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. परिवर्तनवादी, आंबेडकरवादी, रिपब्लिकन, डावे समाजवादी, अत्याचार विरोधी कृती समिती, अ. भा. किसान सभा, संभाजी ब्रिगेड, घंटागाडी कामकार संघटना, नवनाथपंथीय बहुद्देशीय संस्था, नशाबंदी मंच, कॉँग्रेस एस.सी. सेल, एस.के. फाउंडेशन, आम्ही सारे नागवंशीय या सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.बलिप्रतिपदा दिनाचे औचित्य साधून शहरातून बळीराजा गौरव रॅली काढण्यात आली. प्रास्ताविक समितीचे मुख्य निमंत्रक राहुल तुपलोंढे यांनी केले. यावेळी अ.भा. किसान सभेचे सुनील मालुसरे, प्रफुल्ल वाघ, भारतीय बौद्ध महासभेचे बच्छाव गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. आंबेडकर पुतळा येथून या गौरव रॅलीला सुरुवात झाली. दिलीप लिंगायत, लहुजी वस्ताद यांची वेशभूषा केलेले रोहित कानडे आणि शेतकºयाची वेशभूषा केलेले योगेश बर्वे यांनी लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमासाठी नितीन पाटील, अविनाश अहेर, गणपत कटारे, सविता खैरनार, स्मिता तुपलोंढे, योगेश बर्वे, रोहित कानडे, दिलीप लिंगायत, योगेश कापसे, संतोष नाथ, सचिन जाधव, बापू पवार, अनिता पाटील, वैशाली जाधव आदींनी प्रयत्न केले.यांचा झाला गौरवउमा दिंडे सोनवणे (मानवाधिकार), अनिल आठवले (सामाजिक), नाना बच्छाव (शेतकरी संघटना), प्रमोद साखरे (युवक चळवळ), चंद्रकांत बोंबले (मनपा कर्ममारी), डॉ. स्वप्नील इंगळे (संभाजी ब्रिगेड) यांना गौरविण्यात आले. नवनाथपंथीय संस्थेला उत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार देण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक