शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कडधान्याचे होणार वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:25 IST

पेठ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ३१ मार्चपर्यंत राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय आणि १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाउनची केंद्र शासनाची घोषणा या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित राहू नयेत यासाठी शिल्लक तांदूळ व कडधान्य समप्रमाणात विद्यार्थांना वाटप करण्यात यावे, अशा प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : शिल्लक धान्यसाठा समप्रमाणात वाटप करण्याच्या दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ३१ मार्चपर्यंत राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय आणि १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाउनची केंद्र शासनाची घोषणा या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित राहू नयेत यासाठी शिल्लक तांदूळ व कडधान्य समप्रमाणात विद्यार्थांना वाटप करण्यात यावे, अशा प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त अनुदानातून देशातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना सुरू असून, सध्या कोरोनामुळे शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत. मात्र या कालावधीत शालेय विद्यार्थी पोषण आहार योजनेपासून वंचित आहेत अशा प्रकारच्या याचिका दाखल करण्यात आल्या. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शालेय शिक्षण व क्र ीडा विभागाने परिपत्रकाद्वारे शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ व कडधान्य विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या उपस्थितीत पालकांना वाटप करण्यात येणार असून, सर्वचपालकांना एकाच वेळी शाळेत न बोलावता टप्प्याटप्प्याने पालक व विद्यार्थी यांना बोलवण्यात यावे तसेच दिव्यांग किंवा आजारी पालक किंवा विद्यार्थांच्या घरी जाऊन तांदूळ व कडधान्य वाटप करावे, असेही सांगण्यात आले आहे.सोशल डिस्टन्सिंगची घ्या खबरदारीशालेय मुलांना धान्यवाटप करताना कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही तसेच प्रत्येक व्यक्तीमध्ये किमान एक मीटरचे अंतर राहील, असे नियोजन करावे लागणार असून, यामध्ये कोणीही एकमेकांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रारंभी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शाळानिहाय शिल्लक धान्यादी मालाचा आढावा घेण्यात येणार असून, जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांना तांदूळ व कडधान्य वाटप करण्यात येणार आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थी