शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरवैद्य येथील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत कीटकनाशकांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 22:25 IST

इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे तालुका कृषी विभागाकडून रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला असून, हरभरा उत्पादनवाढीसाठी हरभरा पीक प्रात्यक्षिक राबविण्यात आले. कृषी सहायक एस.डी. चव्हाण यांच्या उपस्थितीत हरभरा पीक प्रात्य-क्षिकांसाठी निवड करण्यात आलेल्या महिला शेतकऱ्यांची शेतीशाळा घेण्यात येऊन कीटकनाशकांचे वाटप करण्यात आले.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे तालुका कृषी विभागाकडून रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला असून, हरभरा उत्पादनवाढीसाठी हरभरा पीक प्रात्यक्षिक राबविण्यात आले. कृषी सहायक एस.डी. चव्हाण यांच्या उपस्थितीत हरभरा पीक प्रात्य-क्षिकांसाठी निवड करण्यात आलेल्या महिला शेतकऱ्यांची शेतीशाळा घेण्यात येऊन कीटकनाशकांचे वाटप करण्यात आले.इगतपुरी तालुका कृषी विभागामार्फत नवीन वाणाचा प्रचार-प्रसार, उत्पादन वाढ व कडधान्य पीक क्षेत्रात वाढ होण्यासाठी नांदूरवैद्य येथे २५ एकरसाठी हा प्रकल्प राबविण्यात आला असून, आरव्हीजी २०२ या वाणाचे हरभरा पीक प्रात्यक्षिके तसेच दर आठवड्याला शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नांदूरवैद्य येथील शेतकºयांची या हरभरा पीक प्रात्यक्षिकासाठी निवड करण्यात आली असून, सदर शेतकºयांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीक प्रात्यक्षिके दाखविण्यात येत आहेत. या सत्रातील शेतीशाळेच्या हरभरा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले असल्याचे कृषी सहायक एस.डी. चव्हाण यांनी सांगितले.याचा फायदा तालुक्यातील सर्व महिला व शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी उपस्थित महिला व शेतकºयांना कृषी सहायक एस.डी. चव्हाण यांनी केले. नांदूरवैद्य येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी उपसरपंच मोहन करंजकर व कृषी सहायक एस. डी चव्हाण यांच्या हस्ते येथील शेतकºयांना कीटकनाशके व फिनल ट्रॅपचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी उपसरपंच मोहन करंजकर, पंढरीनाथ मुसळे, कृषी सहायक एस. डी. चव्हाण, ग्रा.पं. सदस्य नितीन काजळे, सुकदेव दिवटे, रमेश दवते, दत्तू काजळे, बाळू यंदे, लक्ष्मण मुसळे, दशरथ, सुभाष मुसळे, राजू यंदे, बाजीराव काजळे आदी शेतकरी उपस्थित होते.कृषी सहायक चव्हाण यांनी शेतकºयांना हरभरा पिकावर येणारे रोग, कीड व त्यावरील उपाययोजनांच्या माहितीचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे हरभरा पिकासाठी जमिनीची निवड, पेरणी पद्धत, द्यावयाची खतमात्रा, तणनियंत्रण, कीड व रोगनियंत्रणाबाबतचे मार्गदर्शन सहभागी महिला शेतकºयांना करण्यात आले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी