शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मका खरेदी केंद्रांचा मुहूर्त टळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 02:07 IST

खुल्या बाजारात शेतकऱ्यांची व्यापाºयांकडून होणारी लुबाडणूक टाळण्यासाठी यंदाही सरकारने हमीभावाने मका खरेदी केंद्रे १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी, यंदा पावसाच्या हुलकावणीमुळे उशिराने झालेल्या पेरणीमुळे शेतकºयांच्या मक्याचे कणीस अजूनही शेतात पडून असल्यामुळे तालुका खरेदी-विक्री केंद्रामार्फत मका खरेदीचा मुहूर्त टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक : खुल्या बाजारात शेतकऱ्यांची व्यापाºयांकडून होणारी लुबाडणूक टाळण्यासाठी यंदाही सरकारने हमीभावाने मका खरेदी केंद्रे १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी, यंदा पावसाच्या हुलकावणीमुळे उशिराने झालेल्या पेरणीमुळे शेतकºयांच्या मक्याचे कणीस अजूनही शेतात पडून असल्यामुळे तालुका खरेदी-विक्री केंद्रामार्फत मका खरेदीचा मुहूर्त टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  सन २०१८ च्या हंगामातील मक्यासाठी सरकारने १७०० रुपये प्रतिक्विंटल दर निश्चित केला असून, गेल्या वर्षापेक्षा २७५ रुपये दर वाढवून दिला असल्यामुळे शेतकºयांना त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, गेल्या वर्षी सर्वदूर समाधानकारक पडलेल्या पावसामुळे सरकारने मार्केट फेडरेशनच्या माध्यमातून मका खरेदी केंद्रे सुरू केली होती. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने नाशिक जिल्ह्णात अवघ्या दोन महिन्यांत ९६,६३३ क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली. तरीदेखील जवळपास दीड हजाराहून अधिक शेतकºयांना या विक्रीपासून वंचित राहावे लागले होते. यंदा सरकारने मक्याचा हमीभाव वाढवून देत १ नोव्हेंबरपासून खरेदी-विक्री केंद्रांवर शेतकºयांनी सातबारा उताºयासह नोंदणी करून आपला मका विक्रीसाठी नेण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्णासाठी दहा खरेदी केंद्रे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तालुक्याच्या तहसीलदारांनी खरेदी केलेला मका साठवणुकीसाठी खरेदी-विक्री संघाला गुदाम उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा मक्याच्या उत्पादनात पावसाच्या वक्रदृष्टीने मोठी घट झाली असून, त्यातही उशिराने पेरणी झाल्यामुळे अजूनही काही शेतकºयांचा मका शेतात उभा आहे तर काहींनी तो काढून खळ्यावर तसाच ठेवला आहे. त्यामुळे मुहूर्तावर मक्याची खरेदी जवळपास अशक्य असल्याचे फेडरेशनच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.संघांची तूर्त अनुत्सुकतायेवला, लासलगाव, निफाड, देवळा, सटाणा, नांदगाव, मालेगाव, चांदवड, सिन्नर व नामपूर या दहा ठिकाणी खरेदी-विक्री संघांना पत्र देऊन मार्केट फेडरेशनने १ नोव्हेंबरपासून मक्याची नोंदणी व खरेदी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी बुधवारी मार्केट फेडरेशनने आढावा घेऊन तशा सूचना दिल्या, परंतु अद्यापही काही केंद्रांवर सोयाबीन, मूग, उडीद खरेदी केंद्रे सुरू असल्यामुळे खरेदी-विक्री संघांनी तूर्त मका खरेदी करण्यास अनुत्सुकता दर्शविली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजारAgriculture Sectorशेती क्षेत्र