शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने  वाहनचालकांना  कचरा पिशव्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:41 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहन योग्यता प्रमाणपत्र तपासणी तसेच नूतनीकरण कामासाठी येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनात स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरापेटी बंधनकारक करण्यात आली आहे.

पंचवटी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहन योग्यता प्रमाणपत्र तपासणी तसेच नूतनीकरण कामासाठी येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनात स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरापेटी बंधनकारक करण्यात आली आहे.पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्या हस्ते वाहनचालक-मालकांना कचरा पिशव्यांचे वाटप करण्यात आले.  प्रवासी वाहतूक करणाºया सर्व रिक्षा, कूल कॅब, लक्झरी बसवाहनांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनचालक व मालक यांची संपूर्ण माहिती दर्शविणारा फलक, सामान्य जनतेच्या आरोग्याच्या व सार्वजनिक रस्त्यावरील स्वच्छतेच्या दृष्टीने प्रत्येक प्रवासी वाहनात कचरापेटी, कचरा पिशव्या ठेवणे बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार टॅक्सी, वाहनचालक व मालक यांची माहिती दर्शविणारा फलक, वाहनात कचरापेटी बसविण्याचा उद्घाटन सोहळा राधाकृष्णन यांच्या हस्ते पार पडला. प्रादेशिक परिवहन विभागाकडून राबविला जाणारा उपक्रम स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून प्रवासी वाहतूक करणाºया टॅक्सी, स्कूल बस, रिक्षा, लक्झरी सर्व बसगाड्यांमध्ये कचरापेट्या बसवल्या जाणार आहेत.प्रवासी वाहतूक करणाºया सर्व वाहनांमध्ये कचरापेटी बसविणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. सार्वजनिक स्वच्छतेसाठी हा निर्णय घेतलेला आहे. प्रवासी वाहनात अनेकदा प्रवास करताना प्रवासी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, फळांची साले, उरलेले अन्न वाहनांच्या खिडकीतून बाहेर फेकतात परिणामी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरते. नागरिकांना सवय व्हावी तसेच सार्वजनिक स्वच्छता टिकून राहावी यासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून हा निर्णय घेतलेला आहे.  - भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान