शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वखरणी येथे शिधापत्रिकांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 13:26 IST

पाटोदा : आपल्या न्यायहक्कासाठी वारंवार सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवूनही काम होत नसल्याने ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ याचा अनुभव अनेकांना येत असल्याने नको ते काम असे म्हणण्याची वेळ येते. मात्र, येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारु ळे व नायब तहसीलदार प्रकाश बुरु ंगुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विखरणी गावात महा राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या माध्यमातून सुमारे अडीचशे कुटुंबांना नवीन शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देयावेळी नायब तहसीलदार बुरु ंगुळे यांनी शासनाच्या योजनांबाबत माहिती देऊन कोणतेही वाद न करता शिवार रस्ते व पांदण रस्ते मोकळे करून देण्याचे आवाहन केले. मोहन शेलार यांनी वंचितांसाठी कागदपत्रांच्या अटी शिथिल करून कमीत कमी कालावधीत शिधापत्रिका उपलब्ध करून द्यावी

अध्यक्षस्थानी येवला पंचायत समितीचे गटनेते मोहन शेलार होते. मंडल अधिकारी रमेश खैरे, तलाठी विजय भदाणे, सेतू संचालक बाबा डांगे, चेतन मोकळ, ग्रामसेवक गोपीचंद खैरे, सरपंच रामदास खुरसणे, उपसरपंच मंगल शेलार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्र मास सोपान पगार, दौलत शेलार, परशराम गोडसे, परशराम शेलार, भागवत शेलार, भास्कर शेलार, साहेबराव बिडगर, भीमा खरे, प्रकाश पगार, सुखदेव शेलार, शांताराम खरे आदी उपस्थित होते. नामदेव पगार यांनी सूत्रसंचालन केले. अशोक बंदरे यांनी आभार मानले.कोटवयाची साठी पार झाली, सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजविली. मात्र, दरवेळेस काहीना काही कागदपत्र कमी पडत असल्याने शिधापत्रिका मिळत नव्हती. शिधापत्रिकेअभावी शासनाच्या कोणत्याच योजनांचा लाभ मिळत नव्हता. आता गावातच रेशनकार्ड मिळाल्याने अत्यानंद झाला आहे.-श्रावण खुरसणे, लाभार्थी--येवला तालुक्यात आजही शेकडो कुटुंबे शिधापत्रिकेपासून वंचित असल्याने त्यांना कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. ग्रामीण भागातील आदिवासी व कष्टकरी समाजाला शिधापत्रिका व विविध शासकीय दाखले वितरणाचे काम राजस्व अभियानाच्या माध्यमातून केले जात असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.- प्रकाश बुरु ंगुळे, नायब तहसीलदार