देवगाव : येथे वसुंधरा स्वयंसहाय्यता बचतगटाच्या वतीने शेतकºयांना बांधावर खतेवाटप करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील गर्दी कमी करण्यासाठी शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून बांधावरच शेतकºयांना खते व बियाणे वाटप करण्याचा निर्णय घेतला. तसे आवाहनही शासनाच्या वतीने बचतगटांना करण्यात आले होते. या निर्णयानुसार कृषी विभागाच्या वतीने देवगाव येथील वसुंधरा स्वयंसहाय्यता बचतगटाच्या माध्यमातून शेतकºयांना बांधावर खतेवाटप करण्यात आले. मंडल कृषी अधिकारी डी. एन. सोमवंशी, उपसरपंच विनोदजोशी, पोलीसपाटील सुनील बोचरे, लहानू मेमाणे, कृषी सहाय्यक संदीप कापरे, वाल्मीक बोचरे, कचरू बोचरे, संतोष गव्हाणे, भागवत बोचरे, मनोहर बोचरे, रवींद्र शाहीर, अनिल कुलकर्णी, अजित बोचरे, रामा बोचरे, दादाभाऊ बोचरे, राजेंद्र शिंदे, पुंजाराम सातपुते आदी उपस्थित होते.
देवगाव येथे शेतकऱ्यांना बांधावर खतेवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 00:02 IST