शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात संगणकीय सातबारा वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:10 IST

प्रत्येक नागरिकाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सातबारा उताºयाचे संगणकीकरणाचे काम जिल्ह्यात ९७ टक्के पूर्ण झाले असल्याने येत्या १५ आॅगस्टपासून खातेदारास संगणकीय सातबारा उतारा देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिली.

नाशिक : प्रत्येक नागरिकाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सातबारा उताºयाचे संगणकीकरणाचे काम जिल्ह्यात ९७ टक्के पूर्ण झाले असल्याने येत्या १५ आॅगस्टपासून खातेदारास संगणकीय सातबारा उतारा देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिली.राज्य सरकारने संगणकीय सातबारा देण्यासाठी वर्धा व नाशिकची पायलट प्रोजेक्टसाठी निवड केली होती, त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून हस्तलिखित सातबारा उताºयाचे संगणकीकरणाचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी तलाठ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्याबरोबरच इंटरनेटची जोडणीही देण्यात आली, तथापि, अतिशय किचकट असलेल्या या कामात वेळोवेळी तांत्रिक दोषही निर्माण झाल्याने हे काम वर्षानुवर्षे रखडले. अखेर जिल्ह्यातील १२ लाख १८ हजार १७३ खातेदारांपैकी ११ लाख ८३ हजार ३३२ खातेदारांचे संगणकीकरण करण्यात आले असून, त्याचे प्रमाण ९७.१४ टक्केइतके आहे. अद्याप ३४ हजार ८४१ खातेदारांचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील पेठ तालुक्यात शंभर टक्के संगणकीकरण झाले असून, नाशिकमध्ये सर्वांत कमी म्हणजेच ८९.८० टक्के इतके काम झाले आहे. नाशिक शहरात दोन लाख १० हजार ४७३ खातेदार असून, त्यापैकी एक लाख ८९ हजार ००६ इतक्या खातेदारांचे संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या दहा दिवसांत अपूर्ण काम पूर्ण करून १५ आॅगस्ट रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिक येथे तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्या त्या लोकप्रतिनिधींच्या हस्ते संगणकीय सातबारा उताºयाचे वाटप करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले.जिल्ह्यात ज्या ठिकाणी हस्तलिखित व संगणकीय सातबारा उतारा तंतोतंत जुळले अशा ठिकाणी १ जानेवारी २०१७ पासूनच सातबारा उतारे आॅनलाइन पद्धतीने व डिजिटल सिग्नेचर वापरून नागरिकांना देण्यात येत असून, आजपावेतो ६,४८४ इतके उतारे वाटप करण्यात आल्याचे ते म्हणाले. सातबारा उताºयासाठी तलाठी व मंडल अधिकाºयाच्या कार्यालयाच्या चकरा टाळण्यासाठी नागरिकांनी ‘आपलं सरकार’ या पोर्टलचा वापर करून डिजिटल स्वाक्षरीचे साताबारा उतारा प्राप्त करून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.