बेलगाव कुऱ्हे : वैतरणानगर (ता. इगतपुरी) येथील वैतरणा इंग्लिश स्कूल येथे दिवाळी सणाच्या माध्यमातून आदिवासी गोरगरिबांना हा सण साजरा करता यावा म्हणून आनंद महिला परिषदेच्या पुढाकाराने शालेय साहित्य, आदिवासी महिलांना साडी चोळी, पुरु षांना कपडे वाटप करण्यात आले. यावेळी आनंद महिला परिषदेच्या अध्यक्ष सुषमा दुगड उपस्थित होत्या.येथील श्री साई सहाय समितीचे सल्लागार विजय गडाळे यांच्या प्रयत्नातून चिमुकल्या मुलांना शालेय साहित्याचा लाभ मिळाला.व्यासपीठावर आनंद महिला परिषदेच्या माजी अध्यक्ष शोभा संचेती, वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता कुमावत, शाळेचे चेअरमन गणपत वाघ, शंकर वाघ, नामदेव खातळे आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्र माच्या प्रारंभी जिजाऊंच्या लेकींनी सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद महिला संस्थेच्या पाहुण्यांचे मन जिंकले. शाळेत गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य, कपडे मिळाल्याने त्यांच्या आनंदाला उधाण आले. यावेळी नागोसलीचे सरपंच बाळासाहेब शिंदे, राजू देवळेकर, मनोज वरंदळ, संतोष पाधीर, समीर पटेल आदि उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक एल. जी. गोसावी यांनी केले, तर सूत्रसंचालन अमोल ढेरिंगे यांनी केले. (वार्ताहर)
आदिवासींना कपडे वाटप
By admin | Updated: October 22, 2016 00:10 IST