मानोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक आणि खडकीमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिल्लक असलेल्या पोषण आहारातून तांदूळ, कडधान्य विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्यात आले.मानोरी बुद्रुक शाळेत ४२, तर आणि खडकीमाळ शाळेत ९० पेक्षा अधिक विद्यार्थी असून, या विद्यार्थ्यांना एकाच वेळी हा पोषण आहार नेण्यासाठी न बोलवता टप्प्याटप्प्याने पालक व विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात आले होते. शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगच्या आधारावर उभे करण्यात आले होते.यावेळी सरपंच नंदाराम शेळके, मानोरी बुद्रुक शाळेचे मुख्याध्यापक अगरचंद शिंदे, खडकीमाळ शाळेचे मुख्याध्यापक गेनसिद्ध शिवगोंडे, शिक्षक उमेश मुप्पीडवार, पोलीसपाटील आप्पासाहेब शेळके, मानोरी शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील शेळके, खडकीमाळ शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र शेळके, ग्रामपंचायत सदस्य महेश शेळके, प्रवीण जोशी, राजू शेळके, वैभव शेळके आदी उपस्थित होते.
अन्नधान्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 23:51 IST
मानोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक आणि खडकीमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिल्लक असलेल्या पोषण आहारातून तांदूळ, कडधान्य विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्यात आले.
अन्नधान्याचे वाटप
ठळक मुद्देविद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगच्या आधारावर उभे करण्यात आले होते.