शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

१७०० किलो अमोनियम बायकार्बोनेटचे वितरण

By admin | Updated: September 15, 2016 00:51 IST

७०० लोकांचा प्रतिसाद : आजही होणार वितरण

 नाशिक : प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती विसर्जनामुळे नदीपात्रातील जलप्रदुषण रोखण्यासाठी महापालिकेसह काही स्वयंसेवी संस्थांनी उपलब्ध करून दिलेल्या अमोनियम बायकार्बोनेटच्या पावडरला दिवसभरात सुमारे ७०० लोकांनी प्रतिसाद दिला असून सुमारे १७०० किलो पावडर वितरित करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.१५) सकाळी ९ ते १२ या कालावधीत सहाही विभागीय कार्यालयात पावडरचे वितरण सुरू ठेवण्यात येणार आहे.पीओपीच्या मूर्तींमुळे जलप्रदूषणात भर पडत असल्याने पुणे महापालिकेने मूर्तीच्या विघटनासाठी अमोनियम बायकार्बोनेट या पावडरचा वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्याचे ठरविले आहे. पुण्याच्याच धर्तीवर नाशकातही हा प्रयोग राबविण्याचे महापालिकेने ठरविले आणि त्यासाठी राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स यांच्याकडून तीन टन अमोनियम बायकार्बोनेटची पावडर मागविण्यात आली. महापालिकेने सदर पावडर आपल्या सहाही विभागीय कार्यालयात उपलब्ध करून दिली आणि त्यासाठी स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक करत त्यांच्याशी नागरिकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार, बुधवारी दिवसभरात नाशिक पश्चिम विभागात २५ लोकांनी ५० किलो, पूर्व विभागात २५ लोकांनी १०० किलो, पंचवटी विभागात ५० लोकांनी १३० किलो, सातपूर विभागात ४० लोकांनी ७५ किलो, सिडकोत ७० लोकांनी २५० किलो तर नाशिकरोड विभागात ३२ लोकांनी १०० किलो पावडर नेल्याची माहिती संबंधित स्वच्छता निरीक्षकांनी दिली. दिवसभरात महापालिकेकडून सुमारे २५० ते ३०० लोकांनी ७०० किलो पावडर नेली आहे. याशिवाय, शहरातील पालवी आणि रेनबो फाउण्डेशन या स्वयंसेवी संस्थांनीही एक हजार किलो अमोनियम बायकार्बोनेट मागविले होते. सदर संस्थांकडून दिवसभरात ४०० लोकांनी १००० किलो पावडर नेल्याचे सांगण्यात आले.