जळगाव नेऊर : हे सैनिकांचे गाव म्हणून येवले तालुक्यात ओळखले जाते. देशसेवेसाठी सैनिक आपले कर्तव्य बजावत असतांना गावाकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन मदत करत असले तरी ती अद्याप मिळाली नाही. अशावेळी आपण देशसेवेत असून सुद्धा त्यांच्यातील माणूसपण जागे असल्याने गावाकडील गरजूंना आपणही मदत करावी असे फक्त फोनवर ठरले अन लगेचच कृतीतही आणले गेले. पस्तीस सैनिकांनी प्रत्येकी एक हजार रु पये जमा करून पस्तीस हजार रु पयांचा किराणा माल गावातच खरेदी केला. गावातील गरजू गरीब दोनशे कुटुंबाना वाटप करण्यात आला, यामध्ये साखर, गोडतेल, चहा पावडर, डेटॉल, साबण या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.यामध्ये सुभेदार आनंदा गुंड व विशाल वाघ, रामा शिंदे, तानाजी कुराडे, सुनील शिंदे, मीननाथ सोनवणे, सचिन कदम, अर्जुन चव्हाणके, अनिल शिंदे, रविंद्र शिंदे, संदीप शिंदे, बापु वाघ, सुशील शिंदे, गोविंद मढवई, संभाजी शिंदे, शिवाजी शेळके, गणेश कुराडे, योगेश शिंदे, दीपक ठाकरे, शरद शिंदे, प्रकाश तांबे, चंद्रकांत अिहरे, राहुल वाघ, अनंत दाते, धोंडीराम सोनवणे, पांडुरंग सोनवणे, नवनाथ सोनवणे, बाबासाहेब घुले, किशोर दाते, संदीप शिंदे या आजी माजी सैनिकांसह सरपंच श्रीदेव शिंदे, चंद्रकांत साईनकर, संतोष राजगुरू, गोपी शिंदे, ग्रामसेवक बाळासाहेब बोराडे, भाऊसाहेब शिंदे आदींनी हे वाटप केले.
गरिब दोनशे कुटुंबाना किराणा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 16:42 IST
जळगाव नेऊर : हे सैनिकांचे गाव म्हणून येवले तालुक्यात ओळखले जाते. देशसेवेसाठी सैनिक आपले कर्तव्य बजावत असतांना गावाकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन मदत करत असले तरी ती अद्याप मिळाली नाही. अशावेळी आपण देशसेवेत असून सुद्धा त्यांच्यातील माणूसपण जागे असल्याने गावाकडील गरजूंना आपणही मदत करावी असे फक्त फोनवर ठरले अन लगेचच कृतीतही आणले गेले.
गरिब दोनशे कुटुंबाना किराणा वाटप
ठळक मुद्देकोरोना साथीच्या काळात सैनिकांनी जपली बांधिलकी