शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीच्या नियकांकरीता ग्रामिण पोलिसांना बॉडी वॉर्न कॅमेरे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 22:54 IST

नाशिक : वाहतुक पोलिसांसाठी महत्वपुर्ण ठरणारे बॉडी वॉर्न कॅमेरे अखेर ग्रामीण पोलिस दलास उपलब्ध झाले. ग्रामीण पोलिस मुख्यालयात प्रातिनिधीक स्वरुपात शुक्रवारी सुमारे ४० पोलिसांना कॅमेऱ्यांचे वाटप करण्यात आले. या कॅमेऱ्यांमुळे वाहतुक पोलिसांवर होणारे हल्ले, वादाचे प्रसंग कमी होवून दंड वसुलीच्या कामात देखिल पारदर्शकता येण्यास मोठी मदत होणार आहे.

ठळक मुद्देडिजिटल कार्यपध्दतीमुळे यास आळा घालण्याचा प्रयत्न

नाशिक : वाहतुक पोलिसांसाठी महत्वपुर्ण ठरणारे बॉडी वॉर्न कॅमेरे अखेर ग्रामीण पोलिस दलास उपलब्ध झाले. ग्रामीण पोलिस मुख्यालयात प्रातिनिधीक स्वरुपात शुक्रवारी सुमारे ४० पोलिसांना कॅमेऱ्यांचे वाटप करण्यात आले. या कॅमेऱ्यांमुळे वाहतुक पोलिसांवर होणारे हल्ले, वादाचे प्रसंग कमी होवून दंड वसुलीच्या कामात देखिल पारदर्शकता येण्यास मोठी मदत होणार आहे.रस्त्यावर थांबून वाहतुकीचे नियोजन करणाºया वाहतुक पोलिसांना नेहमीच वादावादी, अरेरावी अया काही प्रसंगांना सामोरे जावे लागते. काही प्रसंगांमध्ये नागरीक पोलिसांवर हल्ले करतात, तर कधी कधी पोलिसही नियमबाह्य वागतात हे या कॅमेºयामध्ये बंदीस्त होणार आहे. जिल्ह्यातील प्रमुख्य तालुक्यातील शहरात गर्दीच्या ठिकाणी वाहनचालक व पोलिस यांच्यात सतत वाद होत असतात. तसेच वाहतुक पोलिसांवर देखिल पैसे घेण्याचे आरोप होत असतात.या पार्श्वभुमीवर नाशिकच्या ग्रामीण जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस दलातील वाहतुक पोलिसांसाठी पोेलिस ठाणे निहाय ४० बॉडी वॉर्न कॅमेºयांचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस उपअधिक्षक सुरेश जाधव, शशिकांत शिंदे, सदाशिव वाघमारे यांच्यासह जिल्ह्यातील पोलिस स्टेशनचे अधिकारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.चौकट....वाहतुक विषय हा सामाजिक पश्न असून यात पोलिस आणि नागरीक यांच्यात वादाचे प्रसंग उद्भवतात. डिजिटल कार्यपध्दतीमुळे यास आळा घालण्याचा प्रयत्न असून पोलिसांचेही काही चुकत असल्यास त्यांच्यावर देखिल कारवाई होवू शकते. बॉडी वॉर्न कॅमेºयांमुळे वाहतुक शाखेच्या कामात पारदर्शकता येईल, शिवाय कायदा हातात घेणाºयांना जबर बसेल. हे कॅमेरे वाहतुक पोलिसांच्या वर्दीवर असणार आहे. त्यामुळे एकाच वेळी सद्या ४० कॅमेरे विविध भागातील दृष्य कॅमेºयात कैद करु शकतील. या कॅमेºयाचे व्हिडीओ फुटेज् पुरावे म्हणून सादर केले जावू शकतील. दंगली, राजकीय सभा, आंदोलने, मारामाºया, छापेमारी अश्या वेळी सुध्दा या कॅमेºयाचा विशेष वापर केला जाणार आहे.(फोटो २७ ग्रामीण पोलिस)