शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

सीईओंनी जाणून घेतल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 19:28 IST

लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : जिल्हा परिषदेच्या सर्वच खात्यांच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, प्रश्न व समस्यांबाबत त्यांच्या संघटनांद्वारे प्रशासन पातळीवर ...

ठळक मुद्देपहिल्यांदाच बैठक : खातेप्रमुखांच्या उपस्थितीत तक्रारींचे निवारण

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या सर्वच खात्यांच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, प्रश्न व समस्यांबाबत त्यांच्या संघटनांद्वारे प्रशासन पातळीवर पाठपुरावा केला जात असला तरी, अशा सर्व खात्यांच्या सर्व संघटनांच्या एकत्रित कर्मचारी महासंघाची शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी खाते प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्यात भुवनेश्वरी यांनी सर्व संघटनांचे म्हणणे जाणून घेत, येत्या दोन महिन्यांत कर्मचा-यांचे स्थानिक पातळीवरील प्रश्न सुटलेले असतील, असे आश्वासन दिले.

जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या या बैठकीत ग्रामसेवक, लिपिक, लेखा विभाग, पशुचिकित्सा, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, कृषी तांत्रिक, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, विस्तार अधिकारी, मुख्य सेविका, वाहनचालक, परिचर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, मैल कामगार अशा सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने कर्मचाºयांना सेवेनुसार आश्वासित प्रगती योजनेंतर्गत लाभ मंजूर करणे, कर्मचा-यांच्या प्रलंबित पदोन्नत्यांबाबत आढावा घेऊन रिक्त पदांवर नेमणुका करणे, सातव्या वेतन आयोगाच्या लाभापासून वंचित असलेल्यांना न्याय देणे, पेसा तालुक्यातील अधिकारी, कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगानुसार एकस्तर वेतन श्रेणी लाभ देणे, गटविकास अधिकाºयांकडून कर्मचाºयांच्या निलंबनाच्या अधिकाराचा दुरुपयोग होत असल्याने त्यांच्याकडील अधिकार काढून घेणे, जिल्हा परिषद कर्मचाºयांवर लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून बेकायदेशीर कामकाजासाठी दबाव टाकला जातो. काम न केल्यास खोट्या तक्रारी केल्या जात असल्याने अशा तक्रारींची शहानिशा करूनच कारवाई करावी, विभागीय आयुक्तालयातील चौकशी अधिकाºयांकडून कर्मचाºयांना खातेनिहाय चौकशीतून दोषमुक्त केल्यावरही जिल्हा परिषदेकडून होणारी पुन्हा चौकशी बंद करावी, अनुकंपा तत्त्वावर दहा टक्के भरतीची अट वाढवून मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणे अशा जवळपास शंभराहून अधिक मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्यावेळी प्रत्येक विभागनिहाय कर्मचाºयांच्या मागण्यांवर खातेप्रमुखांकडून माहिती घेत मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी त्यांना विचारणा केली. त्याचबरोबर सदरच्या मागण्या मान्य करण्याबाबत काय उपाययोजना करता येतील, अशी विचारणा करून त्याबाबत माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या. कर्मचाºयांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शासनस्तरावरील प्रश्नांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद