शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनपात संपाआधीच संघटनांमध्ये फाटाफूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 01:35 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे कर्मचाऱ्यांवर दहशत आणि दडपण निर्माण करीत असल्याचा ठपका ठेवून एकत्र आलेल्या सर्व कर्मचारी संघटनांनी कृती समिती तयार केली, तसेच आयुक्तांना पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला. परंतु त्यानंतर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने प्रशासनाला परस्पर नोटीस देण्यात आल्याने संयुक्त कर्मचारी कृती समितीत फूट पडली आहे.

ठळक मुद्देसेनेला धक्का : सीटू, समता, श्रमिक संघ बाहेर

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे कर्मचाऱ्यांवर दहशत आणि दडपण निर्माण करीत असल्याचा ठपका ठेवून एकत्र आलेल्या सर्व कर्मचारी संघटनांनी कृती समिती तयार केली, तसेच आयुक्तांना पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला. परंतु त्यानंतर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने प्रशासनाला परस्पर नोटीस देण्यात आल्याने संयुक्त कर्मचारी कृती समितीत फूट पडली आहे. सेनेने परस्पर नोटीस बजावल्याने सीटू, समता कर्मचारी संघटना व घंटागाडी कामगारांच्या श्रमिक संघाने काढता पाय घेतला आहे.महापालिका कर्मचाºयांवर कामाचा वाढता ताण असल्याची सातत्याने चर्चा होत असून, त्यातच एक अभियंता घर सोडून निघून गेला होता. तर सहायक अधीक्षक संजयदादा धारणकर यांनी कामाचा ताण सहन न केल्यानेच आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. यानिमित्ताने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात वातावरण तप्त झाले आणि गेल्या बुधवारी (दि. ८) द्वारसभा घेण्यात आली. यावेळी सर्व कामगार संघटना एकत्र येऊन कृती समिती तयार करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी आयुक्तांच्या विरोधात भाषणे होत असतानाच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी आयुक्तांच्या वर्तवणूक सुधारण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला होता आणि त्यानंतर आयुक्तांच्या कार्यपद्धतीत सुधारणा न झाल्यास संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला होता. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांनी पाठिंबा दिला होता. परंतु त्यानंतर शुक्रवारी (दि. १०) म्युनिसिपल कर्मचारी सेनेने आयुक्तांना संपाची नोटीस बजावली आहे.तथापि, सदरच्या संपाबाबत संयुक्त कामगार कृती समितीची बैठक न घेताच परस्पर निर्णय घेतल्याने अन्य कामगार संघटनांनी काढता पाय घेतला आहे, असे संबंधित संघटनांच्या पदाधिकाºयांनी सांगितले. आयुक्तांच्या विरोधातील नक्की आरोप निश्चित करून संपासारखा शेवटचा पर्याय निवडायला होता.प्रशासनाला नोटीस : गंभीर आरोप१४ दिवसांच्या या नोटिसीत कर्मचाºयांवर दडपण आणणे, संघटनेने दिलेली पगारवाढ व अन्य इतर सोयीसवलतींच्या विषयावर चर्चा न करणे, संघटनेच्या पदाधिकाºयांना अवमानास्पद वागणूक देणे, कर्मचाºयांवर खोटे आरोपपत्र ठेवणे आदी अनेक आरोप करण्यात आले आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाStrikeसंप