शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

परिट समाजाच्या व्यवसायाची विस्कटली घडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:28 IST

शुभ्र कांजीच्या कपड्यांची व बागायतदार टोपीची कौशल्याने कडक इस्त्री मारून सुंदर परिट घडी तयार करणाऱ्या जिल्ह्यातील परिट समाजाच्या स्वत:च्या व्यवसायाची घडी आता मात्र कोरोना विषाणूमुळे पुरती विस्कटली आहे. सरकारने या समाजाला विशेष आर्थिक मदत देऊन वीज माफी देण्याची मागणी जिल्ह्यातील परिट-धोबी समाजाने केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा परिणाम : लॉण्ड्री व्यवसाय झाला ठप्प, उपासमारीची वेळ

कसबे-सुकेणे : शुभ्र कांजीच्या कपड्यांची व बागायतदार टोपीची कौशल्याने कडक इस्त्री मारून सुंदर परिट घडी तयार करणाऱ्या जिल्ह्यातील परिट समाजाच्या स्वत:च्या व्यवसायाची घडी आता मात्र कोरोना विषाणूमुळे पुरती विस्कटली आहे. सरकारने या समाजाला विशेष आर्थिक मदत देऊन वीज माफी देण्याची मागणी जिल्ह्यातील परिट-धोबी समाजाने केली आहे.आपल्या कडक इस्त्रीने समाजातील नोकरदार, शेतकरी बागायतदार ते थेट पुढाऱ्यांचे व्यक्तिमत्त्व खुलविणाºया जिल्ह्यातील परिट समाजाच्या व्यवसायाची घडी लॉकडाउनच्या सतराव्या दिवशी कोरोना विषाणूमुळे पुरती विस्कटली आहे. कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे नाशिक जिल्ह्यातील लॉन्ड्री व्यवसाय आजमितीला पूर्णत: ठप्प झाला आहे. यंदा लग्नसराई नसल्याने या व्यवसायावर तब्बल सहा महिने लॉकडाउनचा परीणाम होणार आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात सुमारे दोन हजारांच्या आसपास लॉन्ड्री व्यावसायिक आहेत. पॉवर लॉन्ड्री, ड्रायक्लिनर्स वर्कशॉप यांनी यंदाच्या हंगामाच्या तोंडावर महागडी कपडे धुण्याचे, वाळविण्याची मशिनरी घेऊन ठेवली आहे, परंतु यंदा लग्नसराई होणार नसल्याने कर्ज काढून घेतलेल्या मशिनरींचे बॅँकांचे कर्ज व त्यावरील व्याज कसे फेडायचे, असा सवाल जिल्ह्यातील परीट समाजाने उपस्थित केला आहे. सर्वात गंभीर परिस्थिती ही लहान लॉन्ड्री व्यावसायिकांची असून भाड्याने घेतलेले गाळा दुकानाचे भाडे, वीजबिल कसे फेडायचे, कौटुंबिक उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न या समाजासमोर ‘आ’ वासून उभा आहे. साठ टक्के समाज हा लॉन्ड्री व्यवस्थेवर अवलंबून आहे, काही समाजबांधवांनी प्रशासनासमोर व्यथा मांडली आहे, सरकार गांभीर्याने विचार करत नसल्याची खंत यावेळी व्यक्त केली.दिवसभर इस्त्रीचा धंदा करून तुटपुंज्या पैशांनी चरितार्थ चालविणाºया काही गरीबपरिट समाजाच्या कुटुंबांवर तर अक्षरश: उपासमारीची वेळ आली असल्याचे परिट समाजबांधवांनी सांगितले.सरकारने परिट समाजाला विशेष साहाय्य करून लॉन्ड्री व्यावसायिकांचे तीन महिन्याचे वीजबिल माफ करावे, जागाभाडे व गाळाभाडे सवलत द्यावी, छोट्या लॉन्ड्रीधारकांच्या पाल्यांच्या शैक्षणिक शुल्कात माफी देण्याची मागणी कसबे सुकेणे येथील अनिल रणशिंगे, लक्ष्मण सगर, राजेंद्र रणशिंगे, दिलीप सगर, नितीन रणशिंगे, ओझरचे श्याम सूर्यवंशी, नंदू आंबेकर, आदेश शिंदे, मनोहर बोराडे, काशीनाथ रणशिंगे, मदन रणशिंगे, उगावचे दिलीप जाधव, पिंपळस रामाचे येथील प्रशांत वाघ, शिंगवेचे रवि सगर, चांदोरीचे किरण वाघ, मंगेश लुंगशे व नाशिक जिल्ह्यातील परिट-धोबी समाजाने केली आहे.कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून सरकारने पुकारलेला लॉकडाउन हा एप्रिल-मे दरम्यान सुरूच राहणार असल्याचे दिसते. परिणामी यंदा लग्नसराई होणार नसल्याने लग्नसराईचे मार्च, एप्रिल आणि मे, तसेच पावसाळ्याचे चार महिने असे एकूण सात महिने या व्यवसायावर मंदीचे सावट राहणार असल्याने जिल्ह्यातील लॉन्ड्री व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. परिट समाजाच्या लॉन्ड्री व्यवसायाला घरपोच सुविधा पुरविण्यास परवानगी द्यावी, लॉन्ड्री व्यवसाय हा सेवा गटात असल्याने लॉन्ड्री व्यावसायिकांना शासनाने मोफत सॅनिटायझर, मास्क पुरवावेत, अशी मागणी जिल्ह्यातील लॉन्ड्री व्यावसायिकांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय