शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आठवडे बाजार हटविताना वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:34 IST

आडगाव : कोणार्कनगर येथील मंगळवारी भरणारा आठवडे बाजार अतिक्रमण निर्मूलन पथक आणि पोलिसांनी उधळून लावल्याने विक्रेत्यांच्या विरोधामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. विक्रेत्यांचा विरोध पाहता पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचे समजते. दरम्यान, सदर बाजाराबाबत तक्रारी वाढल्याने कारवाई करण्यात आल्याचे अतिक्रमण विभागाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देकोणार्कनगर : लाठीमार केल्याचा विक्रेत्यांचा आरोप; ग्राहकांची धावपळ

आडगाव : कोणार्कनगर येथील मंगळवारी भरणारा आठवडे बाजार अतिक्रमण निर्मूलन पथक आणि पोलिसांनी उधळून लावल्याने विक्रेत्यांच्या विरोधामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. विक्रेत्यांचा विरोध पाहता पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचे समजते. दरम्यान, सदर बाजाराबाबत तक्रारी वाढल्याने कारवाई करण्यात आल्याचे अतिक्रमण विभागाचे म्हणणे आहे.येथील आठवडे बाजाराबाबत स्थानिकांनी तक्रारी केल्यामुळे बाजार हटविण्यात आला असून अनेकांचा माल जप्त करण्यात आला. यामुळे विक्रेत्यांची धावपळ आणि पथकाची कारवाई यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या दोन अडीच महिन्यांपासून कोणार्क नगर आठवडे बाजार विविध प्रकारच्या वादात सापडला असून, रस्त्यावर भरणाऱ्या बाजारामुळे रहिवाश्यांना अडथळा होत असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने कोणतीही पूर्व सूचना न देता मनपा अतिक्रमण विभाग पथकाने मंगळवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात कोणार्क नगर आठवडे बाजारातील विक्रेत्यांवर कारवाई केली.प्रशासनाने बाजार बंद करण्याचे आदेश विक्रेत्यांना दिल्यानंतर विक्रेत्यांमध्ये व मनपा कर्मचाºयांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे कारवाईत अडथळा निर्माण करणाºयांवर पोलिसांनी लाठीमार केला. पाऊस व गोदावरीला आलेल्या पुरामुळे बाजारात भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी होती, पण अतिक्रमण पथकाच्या कारवाईमुळे विक्रेत्यांना व भाजी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना माघारी फिरावे लागले.

टॅग्स :Crimeगुन्हा