शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आऊटसोर्सिंग ठेक्यातील अनामत प्रकरणी याचिका निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:21 IST

नाशिक- शहरातील सफाईसाठी नियुक्त केलेल्या सातशे सफाई कामगारांकडून वॉटर ग्रेस कंपनीने पंधरा हजार रूपयांची सुरक्षा अनामत रक्कम घेतली असली ती ते परत देणार आहेत, असे स्पष्ट करीत यासंदर्भात दाखल जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

ठळक मुद्देअन्य समित्यांमध्ये हा विषय गाजला होता.

नाशिक- शहरातील सफाईसाठी नियुक्त केलेल्या सातशे सफाई कामगारांकडून वॉटर ग्रेस कंपनीने पंधरा हजार रूपयांची सुरक्षा अनामत रक्कम घेतली असली ती ते परत देणार आहेत, असे स्पष्ट करीत यासंदर्भात दाखल जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.शहर स्वच्छतेसाठी सफाई कामगारांची संख्या कमी पडत असल्याने महापालिकेने आऊटसोर्सिंगने सफाईचा ठेका दिला आहे. वॉटर ग्रेस या कंपनीने सातशे कामगार नियुक्त करण्यात आले आहेत. या कंपनीने सफाई कामगार नियुक्त करताना प्रत्येकी पंधरा हजार रूपये घेतल्याच्या तक्रारी होत्या. महापालिकेच्या महासभा, स्थायी समिती आणि अन्य समित्यांमध्ये हा विषय गाजला होता.यासंदर्भात मनसेचे कार्यकर्ते संदीप भंवर यांनी उच्च न्यायलयात जनहित याचिका दाखल केली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाने कंपनीला पंधरा हजार रूपयांसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कंपनीने प्रतिज्ञापत्र सादर केले, त्यात उमेदवारांकडून घेण्यात येणारे पंधरा हजार रूपये ही अनामत रक्कम आहे. या रकमेतून कामगारांना गणवेश, जीपीएस, झाडू, स्वच्छता साधने आणि व्हील बरोज देण्यात येणार आहे.कोणी कामगाराने नोकरी सोडली तर दिलेल्या वस्तु परत घेऊन त्यांची सुरक्षा अनामत रक्कम परत घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे बुधवारी (दि.१७) उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. वॉटरग्रेसच्या वतीने ॲड. रामपाल कोहली, मिलींद साठे यांनी काम बघितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliticsराजकारण