शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

बनावट शपथपत्राच्या आधारे जमिनीची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:57 IST

तालुक्यातील वडझिरे येथील महिलेच्या नावे असलेल्या १२२ एकरपैकी २५ एकर शेतजमिनीची बनावट शपथपत्राच्या आधारे खोट्या वारसनोंदी करून परस्पर विक्र ी करून विल्हेवाट लावल्या प्रकरणी दहा जणांविरोधात सिन्नरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिन्नर : तालुक्यातील वडझिरे येथील महिलेच्या नावे असलेल्या १२२ एकरपैकी २५ एकर शेतजमिनीची बनावट शपथपत्राच्या आधारे खोट्या वारसनोंदी करून परस्पर विक्र ी करून विल्हेवाट लावल्या प्रकरणी दहा जणांविरोधात सिन्नरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वडझिरे येथील २००८ मध्ये कार्यरत तलाठी, नाशिकरोड येथील गुप्ता नामक खरेदीदार व ठोंबरे कुटुंबातील आठ व्यक्तींचा आरोपींच्या यादीत समावेश आहे. योगेश देवराम ठोंबरे (३१) यांनी या फसवणुकी बाबतची फिर्याद दिली आहे. वडझिरे येथील शेती गट नं. १९२ व २१५ चे एकूण क्षेत्र १२२ एकर २९ गुंठे इतके होते. काळी रामा महार या महिलेच्या नावे असणाऱ्या या क्षेत्राला राही गोविंद भालेराव ही वारस असताना गोविंद राघो ठोंबरे यांचा राघोजी ठोंबरे या व्यक्तीशी काहीएक संबंध नसताना वरील मिळकतीवर बनावट शपथपत्र तयार करून व ते खरे आहे, असे भासवत तलाठ्याच्या मदतीने खोटी वारस नोंद करण्यात आल्याचे फिर्यादित म्हटले आहे. यात २५ एकर क्षेत्र तसेच शैलेश नरेश गुप्ता (रा. कुबेर भवन, नाशिकरोड) याला विक्र ी केली. तसेच गोरख रंगनाथ ठोंबरे, दगू वामन ठोंबरे, निवृत्ती चंदा ठोंबरे, काशीनाथ निंबा ठोंबरे, श्रीधर धोंडीराम ठोंबरे यांचा सदर मिळकतीवर संबंध नसताना त्यांना ठकूबाई हिचे पुतणे आहेत असे सांगून बनावट शपथपत्र तयार करून ते खरे आहे असे भासवून खोटी वारस करून बनावट हक्कसोड पत्र तयार करण्यात आले. भास्कर रंगनाथ ठोंबरे व चिंतामण भीमा ठोंबरे यांनी फिर्यादीचे वडील देवराम ठोंबरे, चुलते बाळू व अशोक ठोंबरे यांचा सदर मिळकतीशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही असे बनावट शपथपत्र तयार  करून फसवणूक केली म्हणून वरील सर्व दहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी