शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

कॅम्प सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था; घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 10:32 PM

कॅम्प भाग हा विस्तारलेला व उच्चभू्र वस्ती असलेला भाग. या भागात रस्ते, पाणी, पथदीप आदी समस्या मार्गी लागल्या आहेत, तर आजही शौचालय, कचरा आदी समस्या कायम आहेत. शौचालय, गटारी, कचरा आदी समस्या आजही येथील नागरिकांचा पिछा सोडत नाही.

ठळक मुद्देमालेगाव : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरी सुविधा पुरविण्याची मागणी

मालेगाव : कॅम्प भाग हा विस्तारलेला व उच्चभू्र वस्ती असलेला भाग. या भागात रस्ते, पाणी, पथदीप आदी समस्या मार्गी लागल्या आहेत, तर आजही शौचालय, कचरा आदी समस्या कायम आहेत. शौचालय, गटारी, कचरा आदी समस्या आजही येथील नागरिकांचा पिछा सोडत नाही.महापालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. शौचालयांच्या भिंतींना मोठमोठे भगदाड पडले आहेत. शौचालयाच्या टाक्या खचल्याने टाक्यांना खडे पडले आहेत. मात्र या दुरवस्थेकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष दिसून येत आहे. हीच मोठी समस्या आहे. अनेक भागात घराच्या दारासमोर गटारी असल्याने डास, चिलटे तसेच दुर्गधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. कचऱ्याबरोबरच घंटागाडीचीही समस्या आहे. संपूर्ण प्रभागात एकच घंटागाडी येत असल्याने काही भागात तर घंटागाडी पोहोचतही नाही. या प्रभागातील शौचालयांचा प्रश्न गंभीर आहे. सोमवार बाजार भागातील शौचालयांची मोठी दुरवस्था आहे. या शौचालयांच्या भिंती पडल्या आहेत तर येथील शौचालयाची टाक्यांना मोठमोठे भगदाड पडले आहेत.या प्रभागात सिंधी कॉलनी, हेरंब गणेश मंदिर, श्रीकृष्णनगर, शीतलामाता नगर, गवळीवाडा, मारवाडी गल्ली, सोनार गल्ली, सोमवार बाजार, टीव्ही सेंटर, भगतसिंग नगर, शाहूनगर आदी भागाचा समावेश होतो.या भागांमध्ये गटारी व शौचालये स्वच्छ करण्यासाठी कर्मचारी प्रभागात फिरकतच नसल्याचे येथील यांचा नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रभागात दररोज बाजार भरतो. सोमवारी तर येथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसह भाजीपाला विक्रेते माल विक्रीसाठी येतात. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मोठी कचराकुंडी ठेवली नसल्याने उरलेल्या भाजीपाल्याची घाण विक्रेते येथेच फेकून निघून जातात. तसेच प्रभागात सुसज्ज असे एकही उद्यान झालेले नाही. मोकाट कुत्रे, डुकरे यामुळे नागरीक त्रस्त झाले. शहराच्या पश्चिम भागात कॅम्प परिसर येतो. या ठिकाणी दिवसागणिक वसाहतींमध्ये भर पडत आहे. हा शहराच्या मोठा भाग समजला जातो. महापालिकेलाही या भागातून मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर मिळत असतो. त्यामानाने या भागाला नागरी सुविधांचा वाणवा दिसून येतो. सार्वजनिक शौचालये, घाण-कचºयाचा ढीग, रस्त्यांवरील खड्डे, गटारींच्या समस्या अद्यापही कायम आहेत. वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून महापालिकेच्या विरोधात आंदोलनेदेखील केली गेली आहेत. कॅम्प परिसरातच शासकीय कार्यालये व मोठी व्यापारी संकुले आहेत. या भागात नेहमीच वर्दळ असते. शहर स्वच्छतेसाठी महापालिकेकडून कुठलीही ठोस उपाययोजना केली जात नाही. रस्त्याकडेला घाण कचºयांचे ढिगारे दिसून येत आहे. महापालिकेने या भागात नागरी सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.कॅम्प भागातील रस्ते, सोडिअम दिवे आदी प्रश्न मार्गी लागले आहेत. मात्र अद्यापही नागरी सुविधांपासून प्रभाग वंचित राहिला आहे. प्रभागातील महिला शौचालयांचा प्रश्न गंभीर आहे. तसेच या प्रभागात महिलांसाठी स्वतंत्र्य उद्यान होणे गरजेचे आहे. कचºयाची विल्टेवाट होत नसल्यामुळे अनेक भागात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.- जगदीश गोºहेकॅम्प परिसर मालेगाव शहराचा अतिमहत्त्वाचा भाग आहे. या भागात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. महापालिकेने या भागात नागरी सुविधा पुरविणे गरजेचे आहे. बहुतांशी ठिकाणी घाण व कचºयाचे साम्राज्य दिसून येते. शौचालयांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सर्वाधिक महसूल देणाºया भागाला महापालिका नागरी सुविधा पुरविताना कुचराई करीत आहे. - प्रमोद बेडेकरशहराचा विस्तार होण्याच्या आधीपासून मालेगाव कॅम्पात वसाहती आहेत. मात्र नगरपालिकेची महापालिका होऊनही या भागाला नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागते. महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. महापालिकेने या भागात नागरी सुविधा पुरवाव्यात.- राकेश येवला

टॅग्स :Governmentसरकार