शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारिपची कार्यकारिणी बरखास्त

By admin | Updated: June 19, 2014 00:56 IST

भारिपचे प्रदेशाध्यक्ष ज. वि. पवार यांनी भारिपची नाशिक जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय नाशिक : उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीपासून पक्षाची भूमिका आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अधिकार याविषयी धुसफूस आणि नाराजी असल्याने गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील पक्षाचे कामकाज थांबले असतानाच आता भारिपचे प्रदेशाध्यक्ष ज. वि. पवार यांनी भारिपची नाशिक जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अधिकार याविषयी पक्षात अंतर्गत दोन मतप्रवाह होते. त्यातूनच स्थानिक पातळीवर उमेदवारांची निवड करणे, काहींना पक्षातून काढून टाकणे आणि परस्पर उमेदवारी घोषित करणे या साऱ्या प्रकारामुळे पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. पक्षात ज्येष्ठ आणि नवे असा वादही रंगला; मात्र त्याचा नंतर इन्कारही करण्यात आला. त्यानंतर माध्यंतरी प्रदेशाध्यक्षांनीच जिल्ह्यातील महिला कार्यकारिणीला बैठकीस बोलावून जिल्हा कार्यकारिणीला टाळले होते. त्याचवेळी झालेल्या बैठकीत नाशिक जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीवर शिक्कामोर्तब झाले असल्याची चर्चा होती. तथापि, जिल्हा कार्यकारिणीने असा कोणताही प्रकार झाला नसल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर पक्षाचे एकूणच कामकाज थांबल्याने आणि प्रदेश पातळीवरून कोणताही आदेश नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा कार्यकारिणीच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण झाला होता. आता प्रदेशाध्यक्षांनी थेट जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा कार्यकारिणीला पक्षाकडून कोणतेही सहकार्य मिळेनासे झाल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. शिवाय ऐन निवडणुकीतही स्थानिक पदाधिकाऱ्यांऐवजी अकोल्यातील आमदाराने नाशिकमध्ये येऊन पक्षाची भूमिका जाहिर केल्यामुळे तर नाराजी अधिकच पसरली होती. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती तर काहींनी कामकाज करणेही थांबविले होते. आता पक्षानेच कार्यकारिणी बरखास्तीचे पत्रक काढल्याने नव्या कार्यकारिणीत कोण असेल आणि जून्या कार्यकारिणीची भूमिका कोणती असेल, त्यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. (प्रतिनिधी)