पिंपळगाव बसवंत : भाजप सरकारने पाठपुरावा करून मिळवून दिलेले मराठा व ओबीसी आरक्षण या बिघाडी सरकारमुळे गेलं. ग्रामपंचायतचे वीज बिल बंद केले. गावागावात फक्त अंधार दिसून येत आहे. कर्जमाफी नाही, या सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला. महाविकास तिघाडी सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे जनतेच्या न्याय्य हक्कासाठी युवा वॉरिअर्सने पुढाकार घेतला आहे. पुढील निवडणुकीत तीनही पक्षांनी आघाडी केली तरी जनतेच्या पाठबळावर भारतीय जनता पार्टी फत्ते करील, अशा शब्दांत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
पिंपळगाव बसवंत येथे भाजप युवा मोर्चा, युवा वाॅरिअर्स व हेल्थ वाॅरिअर्स बैठकप्रसंगी ते बोलत होते. त्यात संघटन मजबुती, समन्वय चर्चा, पुढील योजना, नियोजनात्मक आढावा आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
याप्रसंगी भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, भाजप नाशिक ग्रामीण अध्यक्ष केदा आहेर, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष नाशिक ग्रामीण सचिन दराडे, भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्य सदस्य संकेत बावनकुळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष तथा, नाशिक जिल्हा प्रभारी भाजयुमो सचिन तांबे, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक जिल्हा ग्रामीण सचिन दराडे, जिल्हा संघटन सरचिटणीस, भाजयुमो नाशिक सुरेश पिंगळे, बापूसाहेब पाटील, सतीश मोरे, आल्पेश पारीख, प्रशांत घोडके आदी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी राहुल पिंगळे, सोनाली लंबोरे, सचिन पारीख, भाऊसाहेब धोंगडे, रवी गव्हाणे, अनुप मोरे, अनिकेत निफाडे आदींसह युवा वाॅरिअर्स, हेल्थ वॉरिअर्स व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
पाणीपुरवठ्याचा बोजा टाकला
बावनकुळे म्हणाले की, या सरकारचे मुख्यमंत्री १४ महिन्यांपासून मंत्रालयात नाहीत. रस्त्याचे स्ट्रीट लाइट व पाणी पुरवठ्याचा आर्थिक बिलांचा बोजा ग्रामपंचायतीवर टाकला. त्यासाठी गावागावात अंधार पसरला आहे. पाणी वेळेवर येत नाही आणि वीजही नाही, अशी अवस्था राज्याची या सरकारने करून ठेवली आहे. भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले की, तीन माकडांचे सरकार सध्या महाराष्ट्र राज्यात आहे, एकाने डोळ्यावर, दुसऱ्याने कानावर आणि तिसऱ्याने तोंडावर हात ठेवले आहेत. त्यामुळे जनतेचा अन्याय, अत्याचार त्यांना दिसत नसल्याची टीका केली.
---------------
पिंपळगाव बसवंत येथे भाजप युवा मोर्चा, युवा वाॅरिअर्स व हेल्थ वॲरिअर्स बैठकीप्रसंगी बोलताना माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे. व्यासपीठावर विक्रांत पाटील, केदा आहेर, सतीश मोरे, बापूसाहेब पाटील, प्रशांत घोडके आदी. (२१ पिंपळगाव १)
210721\21nsk_13_21072021_13.jpg
२१ पिंपळगाव १