मुखेड : यंदा अत्यल्प प्रमाणात झालेल्या पावसाने ऊस पिकावर विविध रोग आणि किडींचे आक्रमण झाले आहे. या रोगांवर वेळीच उपचार न केल्यास ऊस उत्पादनात दहा टक्क्यांपासून चाळीस टक्क्यांपर्यत घट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मुखेड परिसरात यावेळी पावसाळ्याच्या प्रारंभापासूनच आत्तापर्यंत अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला आहे. पावसाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या वातावरणातील बदलामुळे उसावर तांबेरा, हुमणी, पांढरा मावा ह्या रोगांनी आक्रमण केले आहे. तांबेरा रोगात उस पिकाचे ४० टक्यांपर्यंत नुकसान होते. सुरुवातीला पानांच्या खालच्या बाजूला लहान लांबट पिवळे टिपके येतात पुढे ते वाढतात. लाल सर तपकिरी होतात. टिपक्याचा भाग फुगतो व फुटतो. त्यातुन नारिंगी बीजाणू बाहेर पडतात. बीजाणूची पावडर बोटास सहज लागते. रोगाची तीव्रता वाढल्या नंतर पाने करपून जातात. वाढ खुंटते साखरेचे प्रमाण कमी होते. ह्यासंदर्भात सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उस विकास अधिकारी शिवाजी देवकर, विभागीय अधिकारी राहुल वक्ते राहुल वक्ते यांनी अशा प्रकारच्या कीड व किटकांसाठी तांबेरा रोगासाठी मॅन्कोझेब हे बुरशीनाशकाची फवारणी करण्याचे सूचित केले आहे. (१८ मुखेड)
180921\18nsk_6_18092021_13.jpg
१८ मुखेड