शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

रोग परवडला, डॉक्टर नको?’

By admin | Updated: August 4, 2014 02:14 IST

रोग परवडला, डॉक्टर नको?’

 ‘रोग परवडला, डॉक्टर नको?’ या शीर्षकाची वृत्तमालिका ‘लोकमत’ने आठवडाभर चालवली. त्यात केलेल्या आवाहनानुसार या विषयावर ‘लोकमत’ला भरभरून प्रतिक्रिया प्राप्त झाल्या. या प्रतिक्रिया व अनुभव आम्ही यथावकाश प्रसिद्ध करणार आहोतच; मात्र तत्पूर्वी या विषयावर आलेल्या काही प्रतिकूल प्रतिक्रिया व त्यासंदर्भातील ‘लोकमत’ची भूमिका आज प्रसिद्ध करीत आहोत...ंलोकमत वृत्तपत्र हे एक निकृष्ट दर्जाचे, रटाळ, कॉपीबहाद्दर वृत्तपत्र आहे. मार्केटमध्ये या पेपरची पत घसरत चालली होती. त्यामुळे लोकांमध्ये सिम्पथी मिळविण्यासाठी इमोशनल बातम्या देऊन मार्केटिंग कॅश करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. समाजात डॉक्टर हा सॉफ्ट टार्गेट मानला जातोय, त्यामुळे कुणीही येड्या गबाळ्याने उठावे आणि भावनिक मुद्दे हातात घेऊन आपला फायदा करून घ्यावा, हेच यावरून दिसून येते. प्रत्येक सामान्य माणसाचा वैद्यकीय क्षेत्राशी रोज संबंध येतोच, त्यातून कडू गोड अनुभव येणारच. त्यातूनच लोकमत वृत्तपत्राने वैयक्तिक फायद्यासाठी ‘रोग परवडला डॉक्टर नको’ ही एकतर्फी श्रृंखला सुरू केली आहे. यात कुठेही डॉक्टरांची बाजू न दाखवता नाशिकमधील डॉक्टर कसे दरोडेखोर आहेत आणि पुणे-मुंबईतील डॉक्टर कसे हुशार, प्रामाणिक आहेत हे दाखविण्याचा जो खटाटोप चालवला आहे तो नक्कीच शंकास्पद आणि निंदनीय आहे. प्रत्येक पेशंट वेगळा असतो आणि डॉक्टरानुसार प्रत्येक वेळी ट्रीटमेंट बदलू शकते. डॉक्टर आपल्या सद्सद्विवेकबुद्धीने रूग्णाच्या भल्यासाठी वेळेनुसारच निर्णय घेत असतात. त्यामुळे डॉक्टर काही देव नाही तसाच तो गुन्हेगारही नाही. काही अपप्रवृत्ती वैद्यकीय क्षेत्रात घुसल्या आहेत, हे मीही नाकारत नाही; मात्र सर्व वैद्यकीय क्षेत्रच खराब आहे असेच कुणीतरी म्हणत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याची वेळ आलेली आहे. मी वैयक्तिक या वृत्तपत्राला आवाहन करतो की, अशा सेन्सिटिव्ह इश्यूवर थोडीतरी मॅच्युरिटी दाखवावी. आपल्या असल्या बातमीमुळे आपण जाणूनबुजून डॉक्टर आणि रूग्ण यातील पवित्र संबंधात तेढ निर्माण करू नये. यामुळे रुग्ण आणि डॉक्टर यात कायमस्वरुपी दुरावा निर्माण होऊ शकतो. त्याचे भविष्यात दीर्घकालीन परिणाम समाजावर जाणवतील. आम्ही सर्व डॉक्टर्स व्यवस्थित जाणतो की, रुग्ण आमच्यासाठी देवच असतात. तेच आमचे मायबाप आहेत. त्यामुळे थोडया अपप्रवृत्तीची सजा पूर्ण वैद्यकीय क्षेत्राला देऊ नये. कारण ज्याप्रमाणे पेशंट्सला डॉक्टरांची गरज असते त्याचप्रमाणे रुग्णाच्या सेवेसाठी डॉक्टरच लागतात. त्यावेळी कुणी अमीर खान किंवा लोकमतचा संपादक पेशंट्स चेकिंग करणार नाही. त्यामुळे असले उद्योग लवकरात लवकर थांबवावेत, नाहीतर आम्हाला संघटित होऊन कायदेशीर बाबींचा विचार करावा लागेल. मी पुन्हा एकदा या वृत्तपत्र शृंखलाचा निषेध करतो आणि वृत्तपत्राकडून वैद्यकीय क्षेत्राची माफी मागावी; अन्यथा संघटित आंदोलन केले जाईल. सोबतच्या चार प्रतिक्रियांपैकी पहिल्या तीन प्रतिक्रिया ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर संचार करीत करीत आमच्यापर्यंत पोचत्या झाल्या, तर चौथी प्रतिक्रिया लघुसंदेशाद्वारे आमच्या एका स्नेह्याकरवी प्राप्त झाली. ‘व्हॉट्स अ‍ॅप’चे संपर्क साधन बहुतेक शून्य विश्वासार्हता घेऊनच जन्मास आले असावे किंवा कालांतराने त्याचा वापर करणाऱ्यांनी त्याची विश्वासार्हता धोक्यात आणली असावी. सबब चारांपैकी ज्या दोन प्रतिक्रियांसोबत नामनिर्देश होता, तो येथे आम्ही मुद्दामच वगळला आहे.रुग्णसेवेच्या धर्माचे जी व्यक्ती अनुसरण करते आणि म्हणूनच जी सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विचारी आहे, अशी व्यक्ती इतक्या हीन पातळीवर जाणार नाही, असा आमचा ठाम विश्वास असल्यानेच आम्ही नामोल्लेख टाळला आहे. तथापि, यातील प्रतिक्रिया क्रमांक १ मधील संदेशाचे डॉक्टर समुदायातीलच काही मंडळींनी आदानप्रदान केल्याने त्यातील काही मुद्दे विचारात घेणे क्रमप्राप्त आहे. डॉक्टरी पेशात काही अपप्रवृत्ती शिरल्या आहेत, हे जर मान्य असेल तर मग या अपप्रवृत्ती निवडून समाजासमोर जर कुणी आणीत असेल म्हणजेच, एकप्रकारे या समुदायाला उपकृत करीत असेल तर त्याचे स्वागतच व्हावयास हवे. जी मंडळी नेकीने आपला व्यवसाय करीत आहेत (आणि अशी लाखोंच्या संख्येत आहेत) त्यांना लोकमतमधील मजकुराचे वैषम्य वाटण्याचे कारणच नाही. अनेक डॉक्टरांच्या दवाखान्यात ‘वुई ट्रीट, ही हिल्स’ असे लिहिलेले असते. यातील ‘ही’ म्हणजे जगन्नियंता. पण अनेक रुग्णांची श्रद्धा मात्र दोन्ही बाबी डॉक्टरच करतात अशी असते व ती अजिबात चुकीची नसते. आणि म्हणूनच या श्रद्धेला जे तडा देऊ पाहतात, त्यांना उजेडात आणणे स्वागतार्हच मानले गेले पाहिजे. तसे होण्याने डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संबंध दुरावणार वा तुटणार तर नाहीतच; उलट अधिक दृढ होतील. दुसऱ्या प्रतिक्रियेला उत्तर देण्याची गरज नाही. कारण त्यात केवळ आदळआपटच आहे. ती वाचल्यानंतर कोणालाही नक्की असेच वाटेल की, डॉक्टरी व्यवसाय आणि लोकमत यांच्यात अकारण कटुता निर्माण व्हावी यासाठी कुणा तिसऱ्याच विघ्नसंतोषी शक्तीचे तर हे काम नव्हे?तिसरी प्रतिक्रिया मोठी मजेशीर आहे. भारतासारख्या कृषीप्रधान देशात, साप आणि नाग हे शेतकऱ्याचे मित्र समजले जातात. कारण पेरलेल्या बियाणाचे, रुजलेल्या रोपाचे आणि उभारलेल्या पिकाचे प्रचंड नुकसान करणाऱ्या उंदरांचा हे सरपटणारे जीव बंदोबस्त करीत असतात. आमचा प्रयत्न तसाच काहीसा असल्याने, साप आणि नागाच्या उपमेचा आम्ही सहर्ष स्वीकार करतो. प्रस्तुत प्रतिक्रिया कोणा डॉक्टरचीे असणे शक्यच नाही, अशी आमची खात्री पटण्यास आणखी एक कारण आहे. जो डॉक्टर आहे, तो विज्ञानाचा विद्यार्थी आहे. आणि साप वा नाग दूध पीतच नाही, ते एक मिथक आहे, ही बाब विज्ञानाच्या विद्यार्थ्याला नि:संशय ज्ञात असते. इंग्रजीतील प्रतिक्रियेला इंग्रजीतूनच उत्तर द्यायचे तर एकच म्हणता येईल,ैखङ्म४१ल्लं’्र२े ु८ ्र३२ ीिा्रल्ल्र३्रङ्मल्ल ्र२ ल्लीँ३्र५्र२ेै वृत्तपत्र म्हणजे आरती संग्रह नव्हे! त्यातून जी मंडळी नेकीने आणि आपल्या धर्माला जागून, सद्सद्विवेकबुद्धीने काम करीत असतात, त्यांना अशा रीतीने काम न करणाऱ्यांना उजेडात आणण्याने धक्का बसण्याचे कारणच काय?ज्या व्यवसायात आम्ही स्वत: गेली तीन तपे कार्यरत आहोत, त्या व्यवसायावर म्हणजे प्रसार माध्यमांवरही असेच हल्ले होत असतात. ते झालेही पाहिजेत कारण या व्यवसायातही अपप्रवृत्ती आहेतच. पण अशा अपप्रवृत्ती कुणी ठेचून काढल्या तर आम्हाला स्वत:ला ना कधी धक्का बसतो, ना कधी आमचा जीव कासावीस होतो.- संपादक, लोकमत, नाशिक