शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रामीण विकासाची संधी आणि आव्हाने’ या विषयावर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 18:58 IST

सिन्नर महाविद्यालयात पुणे विद्यापीठ आणि वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या ‘ग्रामीण विकास संधी आणि आव्हाने’ विषयावरील राज्यस्तरीय चर्चा सत्राचे उद्घाटन करण्यात आले.

सिन्नर : ग्रामीण भागातील नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून असून त्यांच्यात प्रचंड निराशा आहे. शासकीय व अशासकीय संस्थांनी पुढाकार घेवून ग्रामीण भागात शाश्वत उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मविप्रचे इगतपुरी तालुका संचालक भाऊसाहेब खताळे यांनी केले.सिन्नर महाविद्यालयात पुणे विद्यापीठ आणि वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या ‘ग्रामीण विकास संधी आणि आव्हाने’ विषयावरील राज्यस्तरीय चर्चा सत्राचे उद्घाटन खताळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपिठावर डॉ. एस. बी. श्रीवास्तव, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, एस. के. गायकवाड, डॉ. पगार आदी उपस्थित होते. विकास ही फक्त शहरी भागाची मक्तेदारी नसून शासन, शैक्षणिक संस्था अशासकीय संघटना आणि स्वयं मदत संघ यांनी ग्रामीण भागाचा विकास करणे आवश्यक आहे असे मत प्राचार्य डॉ. शिंदे यांनी प्रास्तविकात व्यक्त केले. स्वार्थीच्या पलिकडे जाऊन समस्येच्या मुळाशी जाण्याची तयारी आसल्यास ग्रामीण विकास शक्य आहे असे प्रतिपादन डॉ. श्रीवास्तव यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या ग्रामीण भागातील असंतोष दर्शवितात असेही ते म्हणाले. चर्चास्त्राच्या उद्घाटन बिजभाषणात ते बोलत होते. जलसंधारण, आरोग्य यासारख्या मुलभूत सुविधांबरोबरच शेतीतील नवनवीन तंत्राचा वापर आणि स्पर्धात्मक बाजारपेठा केल्यास ग्रामीण विकास निश्चित होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले. योगेश भारस्कार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संतोष दळवी यांनी आभार मानले. 

टॅग्स :Nashikनाशिकcollegeमहाविद्यालय